शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 18:22 IST

मिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण? जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.

ठळक मुद्देमिठबांव नगरीत भरला गुरूशिष्याचा अनोखा मेळा २४-२५ वर्षापूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा राज्यभरातील प्रशिक्षणार्थीनी एकत्र येत अनुभवला त्याकाळचा आनंदसंयुक्त महाराष्ट्र मिठबांवमध्ये, हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅली

मिठबांव (सिंधुदुर्ग) : मिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण? जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.

मिठबांव अध्यापक विद्यालयात शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शिक्षकांचा व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या  बीस साल बाद अनोख्या स्नेहमेळाव्याचे ते निमित्त होते. सन १९९३ ते सन १९९९ सालातील तब्बल सहा बॅचच्या अध्यापक विद्यालय मिठबांवच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जुन्या आठवणी जाग्या करताना राज्यभरातून आलेले शिक्षक सहभागी झाले होते.

बीड येथून आलेल्या हालग्या कडाडल्या...विदर्भ, मराठवाडा प.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले सवंगड्यांनी हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅलीद्वारे सर्वांनी मिठबांवची आराध्य देवता श्री रामेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या स्नेह मेळाव्याचा प्रारंभ झाला.

त्यानंतर क्षा.म.स.शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. रा.का. शिरोडकर व एच.डी. गावकर, माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ज्ञ आर. आर. लोके यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक व एम.के.लोके यांच्या शुभहस्ते घालून तर व्ही.एस.डगरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर क्षा.म.स. शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष श्रीपाद फाटक, पदाधिकारी एम.के. लोके, .व्ही. एस. डगरे, बी. के. चव्हाण, प्राचार्य एल.एस. संकपाळ, एस.बी. सकपाळ, एच.आर. मोहिते, प्रा.एम.वाय. बारदेस्कर, प्रा.टी.व्ही. मालंडकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक नंदकुमार सोमण, पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर , नागेश फाटक, विद्यामान प्राचार्य माने, बी.के चव्हाण व इतर प्राध्यापकवर्ग व प्रत्येक बॅचचा एक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कोषाध्यक्ष प्रा. भालचंद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गिरमकर यांनी केले.

याप्रसंगी माजी प्राचार्य एल.एस. संकपाळ, नंदकुमार सोमण, यांच्यासह माजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच्यावतीने संतोष चव्हाण, रोहिदास राठोड, संतोष खामकर यांनी मनोगत केले. यावेळी २४-२५ वर्षापूर्वीच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान या सर्व बॅचच्यावतीने सर्व माजी प्राध्यापक वगार्चा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच याच विविध बॅचमधील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सहा शिक्षक तसेच याच बॅचमधील माजी प्रशिक्षणार्थी व सध्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी पुणे येथे कार्यरत असलेले राठोड यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन र्धमराज धूरत यांनी तर आभार जितेंद्र आढाव यांनी मानले. रात्री उशिरापर्यंत माजी प्राचार्य एल. एस संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भजन, गवळीचा, सुस्वर गीत गायनाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

संयुक्त महाराष्ट्र मिठबांवमध्येमार्गदर्शन करताना नंदकुमार सोमण म्हणाले की, आज या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे विद्यार्थी शिक्षक आल्याने मला मिठबांव मध्ये संयुक्त महाराष्ट्रच माज्यासमोर उभा असल्याचे वाटत आहे. तसेच माणसं घडविण्या-या डॉ. शिरोडकर, एच.डी. गावकर , प्रिन्सिपॉल आर.आर. लोके यासारख्या अनेक शिल्पकारांची खाण म्हणजे मिठबांव होय.

नाव उज्ज्वल कराआपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतका भव्य दिव्य कार्यक्रम केला ही अभिमानाची गोष्ट आहे. याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मिठबांव कॉलेजचे नाव असेच राज्यभर उज्ज्वल करावे. संस्थेविषयी असलेली आपुलकी, प्रेम , जिव्हाळा कायम ठेवण्याचे ही त्यांनी आवाहन करीत नियोजनबद्द कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStudentविद्यार्थी