‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा...’

By Admin | Published: December 11, 2015 02:21 AM2015-12-11T02:21:53+5:302015-12-11T02:21:53+5:30

‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, आता लागलाय खोकला..’ या मराठमोळ्या लावणीच्या गीताप्रमाणे दिवाळी संपताच गुलाबी थंडीला खरी सुरूवात होते.

'The month of the cold weather is to blow up the fire ...' | ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा...’

‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा...’

googlenewsNext

गुलाबी थंडीची हौस : तरूण मंडळींना हवीहवीशी वाटणारी
बाराभाटी : ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, आता लागलाय खोकला..’ या मराठमोळ्या लावणीच्या गीताप्रमाणे दिवाळी संपताच गुलाबी थंडीला खरी सुरूवात होते. ही थंडी यौवनाने परिपूर्ण असणाऱ्या तरूण मंडळींना हवीहवीशी वाटते. पानझडीच्या मौसमात या गुलाबी थंडीला रसभरून बहर येत आहे. ही बोचरी थंडी खूपच रोमांचकारी ठरत आहे. त्यामुळेच या गीताची आठवण ही थंडी करून देत आहे.
आपल्या जिल्ह्यातील वातावरण आल्हाददायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निसर्गरम्य, डोंगराळ भागात ग्रामीण परिसराच्या वातावरणामध्ये खट्याळ वारा सर्वांना मदमस्तीत छेडत आहे. मात्र यामध्ये गुलाबी थंडीची हौस भागविण्यासाठी नवदाम्पत्यांना मधुमिलनाची उत्कंठा जागवित आहेत.
दरवर्षीच्या ऋतूमानाप्रमाणे उन्हाळा व पावसाळा जसे आपले स्वरूप भूमिवर प्रतिबिंब ठेवून गेले, तसाच हिवाळासुध्दा आपल्या पाऊलखुणा उमटवण्याच्या नादात लागला आहे.
हिवाळा म्हणताच सर्व आसमंताची सोबती धरणीमाता हिरवळीने नववधूप्रमाणे नटलेली दिसत आहे. पहाटेच्या दवबिंदूमुळे हिरव्या डोंगराळ झाडीच्या भागाचे निसर्गवैभव अधिकच खुलून दिसत आहे.
आता ग्रामीण भागातील थंडी, निव्वळ थंडी नसून गुलाबी आल्हादकारक झाली आहे. राष्ट्रीय उद्यान, वनराई परिक्षेत्र, कोकणाई, काळीमाती, प्रतापगड वनपरिक्षेत्र स्वत:कडे दिसवेंदिवस आकर्षित करण्याचे केंद्रस्थान बनले. तसेच तळे, बोडी, तलाव सकाळच्या सुमारास चंचळणारे पाणी, सूर्याची चमकणारी किरणे पाण्यामध्ये प्रतिमांचे विलक्षण मोहक दृश्य पहावयास मिळत आहे.
अशा हुडहुडविणाऱ्या गुलाबी थंडीचा आनंद तरूणवर्ग तर घेतोच, पण सायंकाळच्या वेळी गावागावामध्ये शेकोटी पेटवून सर्व घरातील लोक-नागरिक एकत्र बसून अनेक भारावणाऱ्या गोष्टी सांगून मनोरंजन करताना आढळताना दिसतात. पहाटेच्या थंडीसोबतच सर्वत्र पसरणारे धुके निसर्ग सौंदर्यात भर घालत आहेत. अशावेळी जम्मू-कश्मिरच्या सौंदर्याच्या रोमहर्षक आठवणी मनात जागवून सोडते. म्हणून आला थंडीचा महिना... आता शेकोटी पेटवा... अशी सादर मनाला घातली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: 'The month of the cold weather is to blow up the fire ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.