फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी अनंत कोरगावकर यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 14:01 IST2021-08-07T14:00:32+5:302021-08-07T14:01:12+5:30

Anant Korgaonkar : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, वैश्य समाज पतसंस्था, फोंडाघाट व्यापारी संघ यांच्या स्थापनेपासून आजवरच्या घोडदौडीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. 

Anant Korgaonkar, a senior trader of Fondaghat, passed away | फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी अनंत कोरगावकर यांचे निधन 

फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी अनंत कोरगावकर यांचे निधन 

कणकवली : श्री देव राधाकृष्ण मंदिर, वैश्य समाज फोंडाघाटचे आधारस्तंभ आणि बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी अनंत उर्फ अण्णा दत्तात्रेय कोरगावकर यांचे वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने निधन झाले. 

जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्या समंजस आणि परोपकारी व धार्मिक स्वभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडोपाड्यांवरील दुकानदारांमध्ये त्यांच्या व्यवहाराबद्दल आदर होता. ते अजातशत्रू आणि सहिष्णू होते.

फोंडाघाटच्या उत्थापनात प्रत्येक क्षेत्रात लांब राहून त्यांचा वावर मार्गदर्शक, दोन पिढ्यांना एकत्र आणून विकासकामे होण्याकडे होता. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, वैश्य समाज पतसंस्था, फोंडाघाट व्यापारी संघ यांच्या स्थापनेपासून आजवरच्या घोडदौडीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. 

श्री देव राधाकृष्ण मंदिरातील त्यांची उपस्थिती अबालवृद्धांना मार्गदर्शक आणि ऊर्जा देणारी होती. त्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात त्यांचे अस्तित्व एकखांबी होते. 

Web Title: Anant Korgaonkar, a senior trader of Fondaghat, passed away