पाडलोसमध्ये बंगला फोडून १ लाख, १० हजारांची रक्कम लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:55 IST2023-08-03T12:54:42+5:302023-08-03T12:55:00+5:30

पाडलोस माडाचे गाळू येथील रामराज अनंतराव प्रभूपार्सेकर यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्याने फोडून रूपये १ लाख, १० हजार लंपास केले.

An amount of 1 lakh, 10 thousand was looted by breaking into a bungalow in Padalos | पाडलोसमध्ये बंगला फोडून १ लाख, १० हजारांची रक्कम लंपास

पाडलोसमध्ये बंगला फोडून १ लाख, १० हजारांची रक्कम लंपास

बांदा  (सिंधुदुर्ग )महेश सरनाईक - पाडलोस माडाचे गाळू येथील रामराज अनंतराव प्रभूपार्सेकर यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्याने फोडून रूपये १ लाख, १० हजार लंपास केले. प्रभूपार्सेकर यांच्या मुलाने रविवारी बागायतीला खत घालण्यासाठी ही रोकड आणली होती. प्रभूपार्सेकर व त्यांच्या पत्नी घरी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत रामराज प्रभूपार्सेकर यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा बांदा पोलिसात तक्रार दिली आहे.

बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील रोकड लंपास केली. तसेच लॉकरमधील नकली बांगड्याही चोरून नेल्या.
सावंतवाडीतील पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

अज्ञात चोरटा स्थानिक व माहितगार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बांदा पोलिस करीत आहेत.

Web Title: An amount of 1 lakh, 10 thousand was looted by breaking into a bungalow in Padalos