शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: तिलारीत ७० हेक्टरमध्ये साकारणार ॲम्युजमेंट पार्क, पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:36 IST

वैभव साळकर दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग ) : तिलारी खोऱ्यात ७० हेक्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित ॲम्युजमेंट पार्कच्या उभारणीच्या हालचाली पाटबंधारे ...

वैभव साळकरदोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तिलारी खोऱ्यात ७० हेक्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित ॲम्युजमेंट पार्कच्या उभारणीच्या हालचाली पाटबंधारे खात्याने सुरू केल्या असून, या पार्क उभारणीच्या अनुषंगाने इच्छुकांनी अर्ज सादर करण्याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरण परिसराचा पर्यटन विकास व्हावा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तिलारी विकास पर्यटन मंच आणि राजकीय नेते प्रयत्न करत होते. त्यातच आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन तज्ज्ञांना आणून तिलारी धरण परिसराची काही महिन्यांपूर्वी पाहणी केली होती व त्याच वेळी तिलारी खोऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲम्युजमेंट पार्क उभारून पाचशे जणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या प्रकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. अखेर याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाटबंधारे खात्याने त्याबाबत एक निविदाच प्रसिद्ध केली आहे. परिणामी, तिलारीच्या पर्यटन विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरुवाततिलारी मुख्य धरणाच्या खालच्या बाजूस हा ॲम्युजमेंट पार्क उभारण्याचा शासनाचा विचार असून, पूर्वीच्या या ठिकाणी असलेल्या आयनोडे गावच्या हद्दीत हा प्रकल्प उभा राहणार आहे. त्याकरिता पाटबंधारे खात्याच्या ताब्यात असलेल्या ७० हेक्टर जमिनीचा वापर केला जाणार आहे. सद्य:स्थितीत संकल्पना, बांधकाम नियोजन, देखभाल दुरुस्ती, संचलन करणे व हस्तांतरण करणे आदी प्राथमिक कामांच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

पार्क उभारणीसाठीच्या इच्छुकांना १७ फेब्रुवारीची आहे मुदतपार्क उभारणीच्या अनुषंगाने प्राथमिक कामे करण्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असलेल्यांनी आपले अर्ज सादर करावेत, यासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुकांना १७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरणtourismपर्यटन