शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

धबधब्यावरील बंधारे पर्यटकांनी फोडले, माजी सरपंचाकडून दुजोरा      

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:36 PM

आंबोलीत बारमाही धबधबे सुरू राहण्याच्या नावाखाली धबधब्याच्या वर सहा फूट बंधारे घातल्याने मुख्य धबधब्यावरून पडणारे पाणी अडले आहे. हे बंधारे आठवड्यात फोडा, अन्यथा आम्ही ते फोडू, असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाला दिला आहे.

 सावंतवाडी - आंबोलीत बारमाही धबधबे सुरू राहण्याच्या नावाखाली धबधब्याच्या वर सहा फूट बंधारे घातल्याने मुख्य धबधब्यावरून पडणारे पाणी अडले आहे. हे बंधारे आठवड्यात फोडा, अन्यथा आम्ही ते फोडू, असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाला दिला आहे. तर काही बंधारे कोल्हापूर येथील पर्यटकांनी फोडल्याची चर्चा आंबोलीत सुरू असून, याला आंबोलीचे माजी सरपंच बाळा पालयेकर यांनीही दुजोरा दिला.

आंबोली घाटात येणा-या पर्यटकांना वर्षानुवर्षे पर्यटनाचा आनंद लुटता येत होता. ब्रिटिशकालीन असलेल्या धबधब्यांवर यावर्षी प्रथमच वनविभागाने बंधारे घातले आहेत. हे बंधारे चौकूळमध्ये असून, त्यामुळेच प्रवाहाने पाणी धबधब्यातून पडत नाही. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. धबधब्याचा प्रवाह कमी झाल्याने धबधब्यावर अंघोळीसाठी येणाºया पर्यटकांची संख्या चांगलीच घटली आहे. याचा परिणाम व्यापाºयांवर झाला आहे.वनविभागानेही प्राण्यांना पाणी मिळावे म्हणून आम्ही बंधारे घातले, असे सांगितल्याने निसर्गाची देणगी असलेल्या ब्रिटिशकालीन धबधब्याच्या प्रवाहात तुम्हाला बंधारे घालण्यास सांगितलेच कोणी, असा सवाल अनेकांनी केला आहे. त्यामुळे पर्यटकही चांगलेच नाराज झाले आहेत. मंगळवारी माजी आमदार राजन तेली यांच्यासह तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, अजय सावंत आदींनी आंबोली धबधब्याला प्रत्यक्ष भेट दिली व पाहणी केली.यावेळी तेथील अनेक स्टॉलधारकांनी माजी आमदार तेली यांच्याकडे आपली कैफियत मांडली. यात धबधब्याच्या वर सहा फुटी बंधारे घातले आहेत. मग पाणी पडणार तरी कसे? १५ जूनपर्यंत सर्व धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत होते. आता २६ जून आला तरी प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू होत नाही, असे सांगितले. तर आंबोलीचे माजी सरपंच बाळा पालयेकर यांनीही धबधब्यावर बंधारे चुकीच्या पध्दतीने वनविभागाने घातले आहेत. आतापर्यंत असे कधीच बंधारे घातले नव्हते. मग आताच असे का केले, असा सवाल करीत धबधबे फुल्ल क्षमतेने प्रवाहित होत नाही याची माहिती कोल्हापूर येथील काही पर्यटकांना कळताच त्यांनी बंधारे फोडले आहेत, अशी चर्चा आंबोली परिसरात असल्याची माहिती पालयेकर यांनी दिली.तर माजी आमदार राजन तेली यांनीही धबधब्याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच स्थानिकांकडून धबधब्यांच्या वर कशा प्रकारे बंधारे घातले आहेत हे समजून घेतले. हे बंधारे सहा फूट आहेत. आतापर्यंत कधीच असे बंधारे घालण्यात आले नसल्याचे स्थानिकांनी माजी आमदार तेली यांना सांगितले आहे. हा प्रकार व्यापारी तसेच पर्यटक यांच्यावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हे बंधारे वनविभागाने हटवावेत अन्यथा आम्ही ते आठ दिवसात ग्रामस्थांना सोबत घेऊन हटवू, असा इशारा तेली यांनी दिला आहे. यावेळी काही व्यापाºयांनी संतप्त भावना व्यकत केल्या. बंधारे फोडल्यास शासकीय निधी वायाआंबोलीतील धबधब्यांच्या वर घालण्यात आलेले बंधारे फोडले तर शासकीय निधी खर्ची घालण्यात आला आहे तो वाया जाईल. मग याला जबाबदार कोण, असा सवाल आता वनविभाग करीत आहे. मग हे बंधारे फोडायचे कोणी या विवंचनेत सध्या वनविभाग असून, सध्या वनविभागाने या बंधाºयाच्या ठिकाणी जाणारी वाटही बंद करून टाकली आहे. तसेच या प्रकारात स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. अन्यथा ग्रामस्थांना घेऊन बंधारे फोडू : तेलीआंबोलीतील धबधब्याच्या वर घालण्यात आलेले बंधारे आठवड्यात फोडा, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी वनविभागाकडे केली आहे. तुम्हाला आठवड्यात जमले नाही तर आम्ही ग्रामस्थ घेऊन हे बंधारे फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तेली यांनी दिला आहे. तसेच धबधब्याच्या वर बंधारे घालणे म्हणजे निसर्गाला आव्हान देण्यासारखे आहे. आतापर्यंत कधी वरून दगड पडले नाहीत, मग आताच पडणार हे वनविभागाला कसे समजले? हा सर्व प्रकार शासनाचा निधी वाया घालवण्यासारखा आहे. हा खर्च अधिकाºयांच्या खिशातून शासनाने घ्यावा अशी मागणी आम्ही वनमंत्र्यांकडे करणार, असे तेली यांनी यावेळी सांगितले.

 व्यवसायावर काहीसा परिणाम जाणवतोअद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने धबधबे पडत नसल्याने पर्यटक येथे येत नाहीत. याचा परिणाम आमच्या धंद्यावर थोडासा जाणवतो, असे मत येथील स्टॉलधारकांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन