परजिल्ह्यातील पर्यटकाची आंबोलीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 15:14 IST2017-09-20T15:12:05+5:302017-09-20T15:14:26+5:30

परजिल्ह्यातील एका पर्यटकाने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे.

Ambalite suicide in the suburbs of Parbilarwa | परजिल्ह्यातील पर्यटकाची आंबोलीत आत्महत्या

परजिल्ह्यातील पर्यटकाची आंबोलीत आत्महत्या

ठळक मुद्देबेवारस चारचाकीही सापडली अपहरणाचा संशय

आंबोली : परजिल्ह्यातील एका पर्यटकाने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे.


जगदीर बलबीर सिंग (वय २६) या तरुणाने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. त्याने गळफास लावून घेउन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


या तरुणाने ज्या ठिकाणी आत्महत्या केली, तेथून चार किलोमीटर अंतरावर होंडा सिटी ही सीएच पासिंगची बेवारस गाडी आढळली आहे. संबंधित तरुणाच्या हातावर जखमा असून त्या जुन्या असल्याचा पोलिसांचा कयास आहे. याशिवाय याच तरुणाने बेवारस गाडीतून राहण्याबाबत परिसरातील हॉटेलमध्ये चौकशी केली होती. संबंधित तरुण मंगळवारी रात्री आंबोलीत आला होता, असे समजते. या तरुणाने काळ्या कापडाने आत्महत्या केली. ही आत्महत्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केल्याचे समजते.


दरम्यान, संबंधित चारचाकी वाहनामध्ये काही बिड्या आणि काळे कापड सापडले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांत काही दिवसापूर्वी अपहरणाची तक्रार नोंद झाली होती, त्याबाबत सावंतवाडी पोलिस तपास करीत आहेत.


आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला असून सावंतवाडीतील पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. ते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Ambalite suicide in the suburbs of Parbilarwa