शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

निरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव  : धनंजय चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 2:12 PM

culture, sindhdudurgnews यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना देऊन गौरविताना आम्हांला अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले.

ठळक मुद्देनिरपेक्षवृत्तीने काम करणाऱ्यांचा नेहमीच गौरव  : धनंजय चितळे मधुसुदन नानिवडेकर यांना पुरस्कार प्रदान

तळेरे : कोकणातील जी मंडळी निरपेक्षवृत्तीने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. त्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरकडून विविध पुरस्कार दिले जातात. त्यातील यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना देऊन गौरविताना आम्हांला अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. ते पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.या पुरस्कार वितरण प्रसंगी पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. संदीप गोनबरे, सुप्रसिद्ध निवेदक प्रसाद घाणेकर, जयलक्ष्मी नानिवडेकर, उज्ज्वला धानजी, कवी प्रमोद कोयंडे, पत्रकार निकेत पावसकर, हेमंत देवस्थळी आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मधुसुदन नानिवडेकर यांच्या घरी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे आणि दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.नानिवडेकरांनी सादर केल्या गझलायावेळी मधुसुदन नानिवडेकर यांनी विविध गझला सादर केल्या. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या सदस्या उज्ज्वला धानजी यांनी शाखेच्यावतीने स्वागत केले. नानिवडेकर यांनी वाचन मंदिर आणि प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, राठोड यांचे आभार मानले.अभ्यासासाठी उपयुक्त१६८ वर्षांची परंपरा असलेल्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतात. संपूर्ण कोकणातील १०० नामवंत व्यक्तींच्या तैलचित्रांचे कला दालन तयार केले आहे. त्यामुळे कोकणचा अभ्यास करायचा असेल तर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला डावलून पुढे जाताच येणार नाही, असे मत यावेळी धनंजय चितळे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग