शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेसोबत युती होताच भाजपात नाराजीचा स्फोट; ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:11 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ओरोस - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा शिंदेसेना महायुतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र, या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रातून उमटले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे उचित वाटत नसल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. कोणत्याही नेत्याविषयी वैयक्तिक नाराजी नसल्याचे स्पष्ट करत आपला राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस भाजपा मंडळात खळबळ उडाली आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचाळकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. 

राजकीय समीकरणे बदलणार का?

दरम्यान, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली होती. मात्र, जागावाटपाच्या घोषणेनंतर लगेचच भाजपामध्ये उफाळून आलेली नाराजी आणि सलग राजीनाम्यांची मालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच जिल्ह्यात याबाबत चर्चा सुरु आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी साहजिकच आहे, परंतु सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नारायण राणेंचा शब्द अंतिम मानला जात असून, सर्व संवादात तेच निर्णय घेणार आहेत.  सत्तेतील सर्व पदे आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून कोणीही वंचित राहणार नाही अशी भूमिका मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीवर घेतली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP infighting erupts after alliance; 43 officials resign en masse.

Web Summary : Upset over the BJP-Shinde Sena alliance in Sindhudurg, 43 BJP officials from Oros Mandal resigned. Discontent arose post seat-sharing announcement for local elections. Efforts are underway to address concerns.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे