पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:02 IST2020-07-16T19:59:21+5:302020-07-16T20:02:15+5:30

मालवण तालुक्याला गेले चार दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ग्रामीण भागात पूरस्थिती असून शेती पाण्याखाली गेली आहे. शहरातही जलमय स्थिती असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

After a hundred rains, Malvan was hit | पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपले

पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपले

ठळक मुद्दे पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपलेसर्वत्र जलमय; शहरातील रस्ते, ग्रामीण भागातील शेती पाण्याखाली

मालवण : मालवण तालुक्याला गेले चार दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ग्रामीण भागात पूरस्थिती असून शेती पाण्याखाली गेली आहे. शहरातही जलमय स्थिती असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दर दिवशी शंभरी (मिलीमीटर) पार केली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता प्राप्त शासकीय आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. मागील आठवड्यात कोसळलेल्या पावसाने शेती पाण्याखाली गेली होती. त्यानंतर चार दिवस उसंत घेतलेला पाऊस पुन्हा दमदार बरसत आहे. पाण्याखाली गेलेल्या शेतीचे काही भागात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दिवसभर जोर कायम

मालवण शहरातील अनेक रस्ते बुधवारी पाण्याखाली गेले. त्यामुळे पाण्यातून वाट काढत पादचारी व वाहनचालक जात होते. सखल भागातील काही दुकानातही पाणी घुसले. दुसरीकडे मच्छीमार्केट खुले होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मत्स्यविक्रेत्या महिलांना भर पावसात मासे विक्री करावी लागली. पावसाचा जोर दिवसभर कायम होता.

Web Title: After a hundred rains, Malvan was hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.