After the assurance, after fasting, they will inspect the main road from Hevel to the road within two days | आश्वासनानंतर उपोषण मागे, मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी उदय जाधव यांना लेखी आश्वासन दिले.

ठळक मुद्देआश्वासनानंतर उपोषण मागे मुळस ते हेवाळे रस्त्याची दोन दिवसांत पाहणी करणार

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडामार्ग येथील ग्रामस्थ उदय केशव जाधव यांनी मागे घेतले.

दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हेवाळे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नाही.

गेली तीन-चार वर्षे या रस्त्याचीअत्यंत वाईट अवस्था आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हेवाळे गावात आणताना या रस्त्याऐवजी तिलारी बाबरवाडीमार्गे आणले जात असल्याने त्यांना या रस्त्याची दुर्दशा कधीच दिसत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी एकदा या गावात येऊन रस्त्याची पाहणी करावी आणि संबंधित रस्त्यातील खड्डे तत्काळ बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करावे. तसेच आवश्यक तेथे गटार बांधून पावसाच्या पाण्याला योग्यरितीने वाट करून द्यावी या मागणीसाठी उदय जाधव यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, संबंधित रस्त्याची येत्या दोन दिवसांत पाहणी करून काम सुरू केले जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडामार्ग येथील ग्रामस्थ उदय केशव जाधव यांनी मागे घेतले.


 

Web Title: After the assurance, after fasting, they will inspect the main road from Hevel to the road within two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.