Aditi Malpekar Bronze Medal Standard! | आदिती मालपेकर कांस्य पदकाची मानकरी !

कणकवली महाविद्यालयात आदिती मालपेकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार वळंजु , प्राचार्य डॉ.संभाजीराव शिंदे, डॉ.बी.व्ही. माळी, प्रा.सुभाष कदम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठ स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत यश

कणकवली (सुधीर राणे ): कणकवली महाविद्यालयातील एम.कॉम.भाग एक मधील विद्यार्थिनी आदिती अशोक मालपेकर ही मुंबई विद्यापीठ स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा माटुंगा येथे झाली. या स्पर्धेत आदिती मालपेकर हिने तायक्वांदो या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

आदिती मालपेकर हिच्या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.संभाजीराव शिंदे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही.माळी, प्रा. सुभाष कदम उपस्थित होते.

कणकवली महाविद्यालयाच्या क्रीडा गौरवात मोलाची भर घातलेल्या आदिती मालपेकर हिच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी.डी. कामत, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Aditi Malpekar Bronze Medal Standard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.