अभिनेता विवेक ऑबेराय सिंधुदुर्गच्या प्रेमात, कुटुंबासह वेगुर्ले अन् सावंतवाडीला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 08:18 IST2021-07-03T06:07:48+5:302021-07-03T08:18:44+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहेत त्यामुळेच अनेक नेते अभिनेते ही सिंधुदुर्ग च्या प्रेमात पडतात काहि दिवसापूर्वी अभिनेता आमीर खानही जिल्ह्यात आला होता

Actor Vivek Oberoi Vengurlyat, 'Lunch Pay Discussion' with Minister Deepak Kesarkar | अभिनेता विवेक ऑबेराय सिंधुदुर्गच्या प्रेमात, कुटुंबासह वेगुर्ले अन् सावंतवाडीला दिली भेट

अभिनेता विवेक ऑबेराय सिंधुदुर्गच्या प्रेमात, कुटुंबासह वेगुर्ले अन् सावंतवाडीला दिली भेट

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहेत त्यामुळेच अनेक नेते अभिनेते ही सिंधुदुर्ग च्या प्रेमात पडतात काहि दिवसापूर्वी अभिनेता आमीर खानही जिल्ह्यात आला होता

 अनंत जाधव

सावंतवाडी : कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे, त्यातच पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा विकसित होत असतनाच अनेक उच्च पदस्थ नेते अभिनेतेही सिंधुदुर्गच्या प्रेमात पडत आहेत. शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरायनेही सिंधुदुर्गला भेट देत वेगुर्लेसह सावंतवाडी येथील पर्यटनाचा आनंद लुटला. कुटूंबा समवेत विवेक सिंधुदुर्गात आला होता, काहि काळ घालवल्यानंतर तो  गोव्याकडे रवाना झाला. यावेळी त्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. विवेक काहीकाळ केसरकर यांच्या निवासस्थानीही थांबला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहेत त्यामुळेच अनेक नेते अभिनेते ही सिंधुदुर्ग च्या प्रेमात पडतात काहि दिवसापूर्वी अभिनेता आमीर खानही जिल्ह्यात आला होता तो तब्बल पाच दिवस जिल्ह्यात कुटूंबा समवेत थांबला होता.तर अनेक क्रिकेटर ही जिल्ह्यात येत असतात त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आर्कषण हे सगळ्यानाच असून सिंधुदुर्ग हा पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे अनेक पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात येऊ घातले आहेत त्यामुळेच प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेराय ही सिंधुदुर्ग च्या प्रेमात पडला आहे. त्यामुळेच तो कुटूंबा समवेत जिल्ह्यात आला होता.वेगुर्ले सह सावंतवाडीत त्याने आपला काहि वेळ घालवला सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांच्या निवास्थानी ही भेट दिली तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर तो पुन्हा गोव्या च्या दिशेने रवाना झाला. सिंधुदुर्ग च्या अतिथीभावाने तो चांगलाच भारावून गेला होता.

Web Title: Actor Vivek Oberoi Vengurlyat, 'Lunch Pay Discussion' with Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.