होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 03:27 PM2021-05-12T15:27:07+5:302021-05-12T15:29:18+5:30

CoronaVirus Kankavali Sindhudurg : कणकवली शहरात ज्या घरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या घरातील इतर लोकांनी स्वॅब तपासणी करणे गरजेचे आहे. घरातील व्यक्ती होम क्वारंटाईन असतानादेखील कुटुंबातील इतर सदस्य खुलेआम लोकांमध्ये मिसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना बाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अशा व्यक्तींवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. असा इशारा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे .

Action if the home quarantine person is found walking outside | होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई

होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई

Next
ठळक मुद्देहोम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाईलॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : समीर नलावडे यांचा इशारा

कणकवली : कणकवली शहरात ज्या घरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या घरातील इतर लोकांनी स्वॅब तपासणी करणे गरजेचे आहे. घरातील व्यक्ती होम क्वारंटाईन असतानादेखील कुटुंबातील इतर सदस्य खुलेआम लोकांमध्ये मिसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोना बाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अशा व्यक्तींवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. असा इशारा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे .

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, होम क्वारंटाईन व्यक्तींच्या घरातील व्यक्ती समाजात राजरोस फिरत असतील तर त्यामुळे कणकवली शहरात हळूहळू कमी होत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे. एकीकडे प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले असताना अशाप्रकारे शहरातील काहींकडून करण्यात येत असलेला हलगर्जीपणा हा प्रशासन व नगरपंचायतकडून गांभीर्याने घेण्यात येणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तीने नियमाप्रमाणे चौदा दिवस क्वारंटाईन राहायचे आहे. मात्र, काही व्यक्ती शहरात फिरताना किंवा इतर लोकांमध्ये मिसळताना आढळत असल्यामुळे अशांवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पोलीस व आरोग्य विभागाकडूनही आवाहन करण्यात आले आहे. मात्र, काहींकडून होणाऱ्या हलगर्जीपणामुळे शहरात रुग्ण वाढण्याची भीती आहे. जनता कर्फ्यूच्या माध्यमातून शहरवासीयांनी, व्यापाऱ्यानी नगरपंचायतीला सहकार्य केले. त्यानंतर हळूहळू शहरातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र काही जणांकडून निष्काळजीपणा दाखवित नियमांची पायमल्ली केली जात आहे. हे योग्य नाही. त्यांनी नियम पाळावेत, असेही म्हटले आहे.

नागरिकांनी नियम पाळावेत

कणकवलीत ज्या घरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींनी दुकानेदेखील सुरू ठेवल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास चालना मिळू शकते. कोरोनाची दुसरी लाट गांभीर्याने घेतली जात असताना असा हलगर्जीपणा कोणीही करू नये. असे केल्यास प्रशासनामार्फत दंडात्मक व कायदेशीर देखील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

Web Title: Action if the home quarantine person is found walking outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app