शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपी अखेर सात वर्षांनी अटकेत

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

देवरुख पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सोलापूर येथे जाऊन तब्बल सात वर्षे फरार असलेल्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (साखरपा) येथील अपघातप्रकरणी एकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला होता. मात्र, देवरुख पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सोलापूर येथे जाऊन तब्बल सात वर्षे फरार असलेल्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आनंद साहेबराव थोरे (३३) असे या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.आनंद थोरे (वरवडे, ता. माडा-सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच ०४ एच ३२१२) घेऊन १४ एप्रिल २००७ रोजी रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. याचवेळी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास ट्रक कोंडगावतिठा येथे आला असता समोरुन येणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली.या अपघातामध्ये रिक्षातील एकजण ठार झाला होता, तर महिला गंभीर जखमी झाली होती. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक थोरे हा फरार झाला होता. देवरुख पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात भादंवि ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.अनेकवेळा त्याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. अनेक वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो आपल्या वरवडे गावी असल्याची कुणकुण देवरुख पोलिसांना लागताच पोलीस हवालदार एन. के. रोडे, ए. बी. पावले, पो. कॉ. व्ही. एस. कांबळे, डी. एन. वाडेकर आदींनी सोमवारी वरवडे गाठले व सापळा रचून थोरे याला घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी ४ वाजता करण्यात आली. यानंतर मंगळवारी त्याला देवरुख पोलीस ठाणत आणून अटक करण्यात आली. सायंकाळी त्याला देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तब्बल सात वर्षांनंतर आरोपीला गजाआड केले. देवरूख पोलिसांनी आरोपी गजाआड करून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (वार्ताहर)