रुग्णवाहिकेला कुंभारमाठ येथे अपघात

By Admin | Updated: July 14, 2014 00:02 IST2014-07-13T23:57:23+5:302014-07-14T00:02:33+5:30

आठ जखमी : कासारटाकाहून परतणाऱ्या भाविकांचा समावेश

Accidents at the Ambulance to Kumbharamath | रुग्णवाहिकेला कुंभारमाठ येथे अपघात

रुग्णवाहिकेला कुंभारमाठ येथे अपघात

मालवण : कासारटाका येथे देवदर्शन करून वनभोजनाचा आनंद लुटून रुग्णवाहिकेतून घरी परतणाऱ्या दहा ते पंधराजणांच्या ग्रुप असणाऱ्या रुग्णवाहिकेला रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ येथे अपघात होऊन आठजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक विजय पुंडलिक केळुस्कर (रा. मालवण) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मालवण रेवंडी येथील बंटी कांबळी यांच्या मालकीची रुग्णवाहिका (जीए ०७, एफ २९९७) घेऊन रेवंडी आणि तळाशील येथील बारा ते पंधराजणांचा ग्रुप कासारटाका येथे देवदर्शन आणि वनभोजनासाठी गेला होता.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कासारटाका येथून विजय पुंडलिक केळुस्कर हे रुग्णवाहिका घेऊन रेवंडीच्या दिशेने परतत असताना मालवण जरीमरी येथील उतारावर एका अवघड वळणावर ही रुग्णवाहिका आली असता चालक केळुसकर यांचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटून गाडी रस्त्यालगत असलेल्या खडकावर आदळली. रुग्णवाहिकेने खडकाला दिलेली ठोकर एवढी जबरदस्त होती की, रुग्णवाहिका काहीशी हवेत उडून पुन्हा पलटी झाली. या रुग्णवाहिकेच्या टाकीतून गॅस लिक होत होता. या अपघातात रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक विजय केळुस्कर हा आत अडकून पडला. त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे तर किरण कांबळी, हरिश्चंद्र कांदळगांवकर, अरुण कांबळी, आकाश कांबळी, संभाजी
कांबळी, शुभम तळाशिलकर, लक्ष्मीकांत कांबळी आदी जखमी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Accidents at the Ambulance to Kumbharamath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.