Sindhudurg: आडारी नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू, धुलीवंदन रंगोत्सव खेळून आंघोळीसाठी गेल्यावर घडली दुर्घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2024 16:31 IST2024-03-25T16:29:26+5:302024-03-25T16:31:22+5:30
मालवण : मालवण शहरालगत असलेल्या आडारी येथील नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज, सोमवारी ...

Sindhudurg: आडारी नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू, धुलीवंदन रंगोत्सव खेळून आंघोळीसाठी गेल्यावर घडली दुर्घटना
मालवण : मालवण शहरालगत असलेल्या आडारी येथील नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज, सोमवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. देवेंद्र उर्फ दीपक जयदास वेंगुर्लेकर (२४) रा. आडारी, मालवण असे मृत युवकाचे नाव आहे. देवेंद्र याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
धुलीवंदन रंगोत्सव खेळून परिसरातील काहीजण आडारी नदी पात्रात ओवळ या ठिकाणी आंघोळीला उतरले असताना एकजण पाण्यात तरंगू लागला. तो काहीच हालचाल करत नसल्याने त्याला पाण्याबाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली असून अधिक माहिती व जबाब नोंद कार्यवाही पोलिसांकडून सूरू होती. ग्रामस्थ व मित्र परिवार यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.