शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मिठबांव येथील तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, मृतदेह गाडीत टाकून मारेकरी पसार; देवगड तालुका हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:12 IST

देवगड : मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (३१) या युवकाच्या निर्घृण खुनाने देवगड तालुका हादरला आहे. ही घटना सोमवारी ...

देवगड : मिठबांव येथील प्रसाद परशुराम लोके (३१) या युवकाच्या निर्घृण खुनाने देवगड तालुका हादरला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ३:३०च्या सुमारास मुणगे मसवी रस्त्यावर घडली. कोयता किंवा सुरा यांसारख्या धारदार शस्त्राने चेहऱ्यावर, डोक्यावर, अंगावर वार करून, प्रसादची त्याच्या स्वतःच्या गाडीतच हत्या करून, मृतदेह गाडीत उलट्या अवस्थेत टाकून मारेकरी पसार झाले. जाताना प्रसाद याच्या गाडीची चावी व त्याचा मोबाइल मारेकऱ्यांनी आपल्याबरोबर नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद हा मिठबांव येथे महा ई-सेवा केंद्र चालवित होता, तसेच तो भाड्याने चारचाकी देण्याचा व्यवसायही करीत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्यांनी सकाळी रुग्णाला घेऊन कुडाळ येथे न्यायचे असल्याने, तुझी गाडी घेऊन ये, असे सांगितले. प्रसाद सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारासच उठून त्याच्या मालकीची कार घेऊन भाडे नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. मात्र, आपण कोणाचे भाडे घेतले आहे, अथवा त्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी घरात आई-वडील व पत्नीला दिली नसल्याने याबाबत उलगडा होऊ शकला नाही.दरम्यान, सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मिठबांवचे सरपंच भाई नरे यांना मसवी येथे कारचा अपघात झाला आहे, असा फोन आल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे मसवी रस्त्यावर कारचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यावर ही गाडी मिठबांव येथील तात्या लोके यांची असल्याचे लक्षात आले. गाडीमध्ये त्यांनी पाहिले असता, प्रसाद लोके हा रक्तबंबाळ अवस्थेत उलट्या स्थितीत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसल्यानंतर, त्यांनी देवगड पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली.लवकरच छडा लावणार : नीळकंठ बगळेदरम्यान, याबाबत देवगडचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे म्हणाले, या खून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, फोन कॉल्स डिटेल्स मागविण्यात आले असून, त्यातून उलगडा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस