शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"दिलेला शब्द म्हणजे बंदुकीची गोळी; १९ फेब्रुवारी २०२७ ला मराठा भवनाचे उद्घाटन करणार - नितेश राणे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 19, 2026 14:47 IST

केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आमचा विश्वास

कणकवली: "मी मराठा समाजाला शब्द दिला होता की, तुमच्या हक्काचे सांस्कृतिक भवन उभे करेन. राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून, पुढच्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल," असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!कणकवली येथे जिल्हा नियोजनाच्या ८ कोटी रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान उभारणीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.​शब्दाला जागणारे सरकार"पालकमंत्री झाल्यानंतरचे हे माझे पहिले मोठे काम आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी समाजातील बांधव मला भेटले होते, त्यांनी हक्काच्या वास्तूची मागणी केली होती. आज त्या मागणीची पूर्तता करताना मला अभिमान वाटतोय. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर आमचा विश्वास आहे."

​राजकारणापलीकडचे नाते"सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंबाचे नाते केवळ निवडणुकांपुरते नाही. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो, पराभूत होतो, तरीही जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे केले. त्या विचारातूनच आम्ही घडलो आहोत. ही वास्तू उभी करताना सकल मराठा समाजाने आपल्या सूचना द्याव्यात, कारण ही वास्तू सांभाळण्याची सामूहिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे."

​इतिहासाची जपवणूक आणि तुलना"शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. आज काही लोक महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करतात, पण ती कधीच होऊ शकत नाही. ज्याने ८००० हिंदूंची कत्तल केली, तो टिपू महाराजांच्या नखाचीही सर धरू शकत नाही. महाराजांनी कधीही कोणत्याही मशिदीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी न्यायाचे राज्य चालवले."

​प्रशासनाची गती आणि पारदर्शकता"स्वराज्यात जसे पारदर्शक प्रशासन होते, तसेच आमचे प्रशासन गतीने काम करत आहे. जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तुमचा सेवक म्हणून मी जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि कोणत्याही संकटात सदैव तत्पर असेन."

​प्रशासकीय ग्वाही​यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, "शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने हे सांस्कृतिक भवनाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत."​या सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, सतीश सावंत, संदेश सावंत, अबिद नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ॲड. उमेश सावंत, एस. टी. सावंत, मनोज रावराणे, सावी लोके, मुख्याधिकारी गौरी पाटील आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maratha Bhavan to open February 2027: Nitesh Rane's promise.

Web Summary : Nitesh Rane vowed to inaugurate the Maratha Bhavan in Kankavli on February 19, 2027. He emphasized the Rane family's commitment to fulfilling promises and highlighted the Bhavan's role in preserving Maratha culture and history, urging community participation in its upkeep.