शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल

By सुधीर राणे | Updated: February 1, 2024 16:24 IST

पीडित शाळकरी मुलीच्या पालकांकडून तक्रार दाखल

कणकवली: कणकवली तालुक्यातील कसवण येथील शाळा क्रमांक २ मधील एका तिसरी इयत्तेतील १० वर्षीय शाळकरी मुलीला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक किशोर बाळकृष्ण गोसावी याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलीला शाळेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे शिक्षक किशोर गोसावी याने त्या पीडित मुलीच्या पायावर व पाठीवर लाकडी छडीने मारहाण केली. अशी तक्रार त्या पीडित मुलीच्या पालकांनी दिली आहे. ही घटना काल, बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी घडल्याचे म्हटले आहे. दाखल तक्रारीनुसार संशयित आरोपी किशोर गोसावी याच्या विरोधात भादवी ३२४ व अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ चे कलम ७५ व ८२ नुसार कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStudentविद्यार्थीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस