शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

..तरच लोकशाही टिकेल, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2022 16:14 IST

महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले.

सिंधुदुर्ग: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता. आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे. जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.वेंगुर्ले येथे बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, बॅ.नाथ पै याची नात आदिती पै, शैलेंद्र पै, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पद्मश्री परशुराम गंगावणे, बॅ.नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी, व्हिक्टर डॉन्टस अमित सामंत,अर्चना घारे-परब, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, संजय पडते आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, बॅ..नाथ पै लहान कुटुंबात जन्माला आले होते. वडिलांचे छत्र लहान पणीच हरपले. आईने छोटी मोठी कामे करून या सात भावंडाना मोठे केले. काही अंतराने बॅ. नाथ पै बेळगाव येथे गेले तेथे त्यांनी स्वातंत्र संग्रामात भाग घेतला आणि तेथूनच बॅ.नाथ पै यांच्या कामाची सुरूवात झाली. त्याचे सुरूवातीचे आयुष्य पूर्ण पणे संर्घषातून गेले. नंतर  पुढे ते इंग्लंडला गेले आणि तेथील काही आंदोलनात भाग घेतला अभ्यास केला. त्यानंतर ते भारतात आले तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले पण पराभूत झाले. पण ते मागे हटले नाहीत. पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रीय सहभाग घेतला. राजापूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आज ही आपण पुस्तक रुपाने वाचत आहोत.बॅ.नाथ पै यांचे विचार ऐकण्यासाठी पंडित नेहरू स्वता थांबतबॅ.नाथ पै यांचे संसदेतील विचार ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही हे स्वता थांबायचे. ते टिका करायचे पण टीकेत व्यक्तिगतपणा नव्हता, समृद्ध लोकशाही प्रणाली टिकण्यासाठी मार्गदर्शन होते असेही पवार म्हणाले.शरद पवार सर्वांचे प्रेरणास्थान - केसरकर मंत्री केसरकर म्हणाले, शरद पवार हे सर्वांचे  प्रेरणास्थान आहेत. बॅ.नाथ हे समाजवादी विचारसरणीचे होते. समाज उन्नतीसाठी ते नेहमी काम करायचे. बॅ.नाथ पै यांच्या स्मृती कायम राहिल्या पाहिजेत. माझ्या राजकीय जडण घडणीत पवार यांचा मोलाचा वाटा असून शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकवल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा अभिमान - राऊत खासदार राऊत म्हणाले, मी संसदेत असतो तेव्हा मला मला बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच या  मतदारसंघाला परंपरा आहे. त्यामुळे मतदार संघाला कुठे ही गालबोट लागू नये म्हणून माझा प्रयत्न असतो. बॅ.नाथ पै याची गाजलेली भाषणे आम्हाला पुस्तकांतून अनुभवायला मिळावीत यासाठी लवकरच संसदेतील भाषणे पुस्तक येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.विठ्ठल याळगी यांनी नाथ पै यांच्या आठवणी जागवल्या. कधी ही त्याच्यात बडेजाव नाही. त्यांना जंगलात शिकारीची आवड होती. 1960 सालीच बॅ.नाथ पै यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न बघितल्याचे त्यांनी सांगितले. ते नंतर सत्यात उतरले. महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले. यावेळी आदिती पै यांच्यासह आमदार बाळाराम पाटील यांनी ही आपले विचार मांडले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSharad Pawarशरद पवार