ओवळीये येथे घराला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 16, 2024 12:33 IST2024-01-16T12:32:12+5:302024-01-16T12:33:32+5:30
मालवण : मालवण तालुक्यातील ओवळीये येथील नंदकुमार मनोहर आंगणे यांच्या घराला काल, सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत घरातील ...

ओवळीये येथे घराला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
मालवण : मालवण तालुक्यातील ओवळीये येथील नंदकुमार मनोहर आंगणे यांच्या घराला काल, सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखोचे नुकसान झाले. मात्र, आग नेमकी कशी लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
आंगणे कुटुंबीय झोपेत होते. जाग येताच आंगणे कुटुंबिय आरडाओरडा करत घरातून सुरक्षित बाहेर पडले. यावेळी आजुबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा सुरु केला. मात्र आग अधिकच भडकत होती. उशिराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.