शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कॅनमधील पेट्रोलचा भडका उडाला, कपड्याच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:17 IST

लगतच्या दुकानांनाही झळ

दोडामार्ग : कॅनमधील पेट्रोलचा भडका उडाल्याने दोडामार्ग शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील ‘बॉम्बे टेक्स्टाइल’ या कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मात्र, तरीही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.दोडामार्ग बाजारपेठेत गुरुवारी सकाळच्या वेळेस दुकाने उघडण्याची वेळ असल्याने बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. मात्र, एक व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनात प्लास्टिकच्या कॅनमधून पेट्रोल घेऊन जात असताना त्या पेट्रोलने पेट घेतला. लागलीच त्याने ती कॅन बाहेर फेकली. मात्र, त्याचा भडका उडाल्याने लगतच्या दुकानाला आग लागली.बॉम्बे टेक्स्टाइल शोरूमच्या दुमजली असलेल्या इमारतीमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूचे नागरिक व व्यापारी धाव घेत तेथे पोहोचले. काही क्षणातच लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूमचा दर्शनी भाग पूर्णपणे जळून काळा झाला, तर आतील भागात धुराचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आग अधिक फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती.या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दाखल झालेल्या बंब व कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा ही आग संपूर्ण बाजारपेठ गिळंकृत करू शकली असती. अग्निशमन यंत्रणेच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

लगतच्या दुकानांनाही झळया आगीत ‘बॉम्बे टेक्स्टाइल’ शोरूमचे मुख्य नुकसान झाले असले, तरी त्याच्या समोरील व आजूबाजूच्या काही दुकानांनाही आगीची झळ बसली. शोरूमसमोर असलेल्या एका दुकानातील प्लास्टिकच्या ताडपत्रीला आग लागून ती जळून खाक झाली. तसेच लगत असलेल्या दोन दुकानांचे नामफलकदेखील आगीत जळून गेले. मात्र, या दुकानदारांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.शोरुमच्या दर्शनी भागाचे नुकसानशोरूमच्या आतमधील कपड्यांचा साठा मोठ्या प्रमाणात असून, सुदैवाने आग त्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे वस्तूंचे फारसे नुकसान झाले नसले, तरीही दर्शनी भागाचे नुकसान, धुरामुळे झालेला त्रास व नामफलकांचे नुकसान यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व पोलिस उपनिरीक्षक आशिष भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.