शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: घनदाट जंगलात विदेशी महिलेला साखळदंडाने बांधून ठेवले, गुराख्यामुळे उघडकीस आली घटना 

By अनंत खं.जाधव | Updated: July 27, 2024 16:18 IST

गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर

सावंतवाडी : रोणपाल- सोनुर्ली येथील घनदाट जंगलात एक वृद्ध विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना आज, शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली. गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्याने या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा असा सावंतवाडीपोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबत माहिती अशी, सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलातून शनिवारी सकाळपासूनच मोठमोठ्याने किचळण्याचा आवाज येत होता. तेथेच गुरांना चरण्यासाठी एक गुराखी गेला होता. त्याला हा आवाज ऐकू आला. त्याने आवाजाच्या दिशेने जात शोध घेतला असता झाडाला एका महिलेला साखळदंडाने बांधलेले आढळले. ही घटना बघून तो गुराखी घाबरून गेला आणि त्याने गावात येऊन ग्रामस्थांना प्रकार सांगितला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कटावणीच्या साह्याने हे साखळदंड तोडले. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही महिला पावसात भिजली होती त्यामुळे तिच्या हातापायांना सुज आली होती. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज बाहेर येत नव्हता. तिच्याकडे काही कागदपत्र मिळाली त्यात त्या महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या उजव्या पायाला साखळदंडा घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आल्याने तिचा पाय सुजला होता. बाकी अंगावर कुठेही जखम आढळून आली नाही तिला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सुधारत असली तरी अद्याप पर्यत तिला बोलता येत नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महिलेच्या पतीवरच संशय व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी महिलेची विचारपूस केली असून रूग्णालयात आणून तिचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

मडुरा रेल्वे स्थानकावर उतरून सोडल्याचा अंदाज घटनास्थळावरून मडुरा रेल्वे स्थानक हे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटावर असून कदाचित कृत्य करणाऱ्या व्यक्तिने मडुरा स्थानकावर उतरून नंतर तिला रोणापाल येथील जंगलात नेले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र पोलिस अद्याप तशी पुष्टी करताना दिसत नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगलWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीSawantwadiसावंतवाडीPoliceपोलिस