शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मालवणमध्ये लाटांच्या तालावर डॉल्फिनचा रास; ७५ जलराण्यांचा चिवला बीचवर अद्भुत सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 08:11 IST

सागरी जीव संशोधक डॉ. विशाल भावे आणि त्यांच्या चमूने ‘सरगॅसम’ समुद्री शैवाल प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असताना, हा अद्भुत नजारा ड्रोन कॅमेऱ्यात कैद केला.

संदीप बोडवे

मालवण (जि.सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गच्या अथांग दर्याची जैवविविधता किती श्रीमंत आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मालवणच्या चिवला बीचवर आला आहे. समुद्रामध्ये चक्क ७५ हून अधिक ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन्स’चा एक विशाल समूह एकाच वेळी बागडताना दिसून आला. लाटांच्या तालावर ताल धरत, अधूनमधून पाण्यातून उंच झेप घेणाऱ्या या जलराण्यांचा ‘रास’ पाहून निसर्गप्रेमी आणि संशोधक भारावून गेले आहेत.

सागरी जीव संशोधक डॉ. विशाल भावे आणि त्यांच्या चमूने ‘सरगॅसम’ समुद्री शैवाल प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असताना, हा अद्भुत नजारा ड्रोन कॅमेऱ्यात कैद केला.

ड्रोनमुळे उलगडले अचूक संख्याबळ

मालवणच्या किनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शन नेहमीच घडते, पण ७५ चा आकडा थक्क करणारा आहे. सुरुवातीला काही मोजकेच डॉल्फिन असावेत असे वाटत होते.

मात्र, ड्रोनने उंचीवरून पाहिल्यानंतर तीन उप-गटांमध्ये विभागलेला हा भलामोठा ताफा स्पष्टपणे दिसून आला. यामुळे या प्रजातीच्या वर्तणुकीचा नवा पैलू समोर आला आहे.

‘सरगॅसम’ प्रकल्पात गवसला खजिना

‘मॅन्ग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी फाउंडेशन’च्या सहकार्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या तपकिरी शैवाळाचा (सरगॅसम) अभ्यास सुरू आहे. या सर्वेक्षणादरम्यान डॉल्फिनचा हा ‘महाकळप’ आढळला. कोकणच्या समृद्ध सागरी अन्नसाखळीवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने डॉल्फिन्स दिसणे, हे या भागातील सागरी अन्नसाखळी आणि पाण्याची गुणवत्ता उत्तम असल्याचे निदर्शक आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे आम्हाला या समूहाचा नेमका आकार आणि हालचालींचे अचूक निरीक्षण करता आले.  डॉ. विशाल भावे, सागरी संशोधक, सृष्टी कन्झर्व्हेशन फाउंडेशन.

डॉल्फिनचा इतका मोठा समूह एकत्र दिसण्याची ही घटना दुर्मीळ मानली जात असून, सोशल मीडियावर या दृश्यांची चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dolphin spectacle: 75 frolic off Malvan's Chivla Beach

Web Summary : A remarkable sight unfolded at Chivla Beach in Malvan, as over 75 Indian Ocean Humpback dolphins were spotted. Marine researchers, surveying seaweed, captured the dolphins' playful behavior. Drones revealed the group's true size, divided into subgroups, showcasing a thriving marine ecosystem and excellent water quality in the region.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग