कणकवलीत ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग, अन् मोठी दुर्घटना टळली
By सुधीर राणे | Updated: November 3, 2023 16:45 IST2023-11-03T16:45:04+5:302023-11-03T16:45:32+5:30
कणकवली: कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेलच्या खालील मजल्यावर असलेल्या एका ऑटो स्पेअरपार्ट दुकानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. यात ...

कणकवलीत ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला आग, अन् मोठी दुर्घटना टळली
कणकवली: कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेलच्या खालील मजल्यावर असलेल्या एका ऑटो स्पेअरपार्ट दुकानाला आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
दुकान मालक संजीव शिरसाट हे दुकान बंद करून घरी गेले होते. या दरम्यान, अचानक दुकानातून धूर येवू लागला. त्याबाबत शेजारील दुकानधारकांनी शिरसाट यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. शिरसाट यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुकानाचे शटर उघडले.
दुकानाचे काउंटर व पुढील भागाला लागलेली आग तातडीने अग्निशामक यंत्राच्या माध्यमातून आटोक्यात आणण्यात आली. तसेच तातडीने नगरपंचायतचा अग्निशामक बंब ही घटनास्थळी दाखल झाला होता. आग तातडीने आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.