खारेपाटण वीज केंद्राला आग, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 22, 2022 18:15 IST2022-09-22T18:14:46+5:302022-09-22T18:15:50+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

खारेपाटण वीज केंद्राला आग, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
खारेपाटण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांना वीज पुरवठा होणाऱ्या आणि जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण येथील वीज केंद्राला आज, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. वीज केंद्र परिसरात असलेल्या डीपींमधून आगीच्या ज्वाला उठत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही.
दरम्यान घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे. तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील खारेपाटणला रवाना झाले आहेत. खारेपाटण येथील वीज केंद्राला आग लागल्याने अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. तसेच स्फोटाचे आवाज येत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट आहे. सायंकाळी उशिरा अग्निशमन बंब दाखल झाला असून महावितरण कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.