शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

क्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:25 IST

गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली.

ठळक मुद्देक्यारच्या थैमानात आठ कोटींचे नुकसानक्यार वादळाच्या फटक्यात सापडला चिवला बिचवरील गजीबो

मालवण : गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. त्या पार्श्वभूमीवर देवगड, मालवण व वेंगुर्ले तालुक्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही मत्स्य विभागाकडून सुरू असून आतापर्यंत ७ कोटी ५२ लाखाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली.ऐन मासेमारी हंगामात झालेल्या चक्रीवादळाने सिंधुदुर्गमधील मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी जाळी वाहून गेली आहेत. काही मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या बोटींचे नुकसान झाले आहे. मासे सुकवणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर राज्य मत्स्य विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा मत्स्य विभागाकडून मच्छीमार नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या मच्छिमारांचे नुकसान झाले मात्र त्यांचे पंचनामे झाले नाही, अशा मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग कार्यालयाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मालवण परवाना अधिकारी श्रुती गावडे, देवगड परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, वेंगुर्ला परवाना अधिकारी चिन्मय जोशी यासह सागरी सुरक्षा रक्षक दलाचे दीपेश मायबा, सागर परब मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे किनारपट्टी गावात प्रत्यक्ष भेटी देऊन करत आहेत.

पंचनामे सुरूच असून अद्यापही काही किनारपट्टी गावातील पंचनाने पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे नुकसानीचा आकडा १० ते १२ कोटींचा पल्ला गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, क्यार वादळ संपून सुटकेचा नि:श्वास सोडेपर्यंत पुन्हा महाचक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Cyclone Vayuवायू चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग