कणकवली : वीजबिलांची थकबाकी न भरल्याने मार्च अखेरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७,७४२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच थकबाकी न भरलेल्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून देण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आचरा ६७४ ग्राहक, देवगड ९२४ ग्राहक, कणकवली ८७९, मालवण ७०३ तर वैभववाडीतील ७८७ ग्राहक असे कणकवली उपविभागातील एकूण ३,९६७ ग्राहक तसेच कुडाळ नंबर १ मध्ये ८५५, कुडाळ नंबर २मध्ये ६१३, सावंतवाडी ग्रामीणमध्ये ३१२ तर सावंतवाडी शहरात ११५८ व वेंगुर्ल्यात ८३७ असे मिळून कुडाळ उपविभागात ३,७७५ ग्राहकांचा वीजपुरवठा मार्च अखेर खंडित करण्यात आला आहे. महावितरणकडून अजूनही थकबाकी वसुलीसाठीची कार्यवाही सुरूच असून, ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
७७४२ थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:12 IST
mahavitaran Kankavli Shindudurg : वीजबिलांची थकबाकी न भरल्याने मार्च अखेरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७,७४२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच थकबाकी न भरलेल्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून देण्यात आली.
७७४२ थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
ठळक मुद्दे७७४२ थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितथकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन