शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकणात ५०० समुद्री कासवांना लावणार टॅग, स्थलांतराची माहिती येणार उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:28 IST

भारतीय वन्यजीव संस्थानचा उपक्रम 

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘भारतीय वन्यजीव संस्थान’कडून (डब्लूआयआय) संपूर्ण देशात सागरी कासवांच्या गणनेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात कोकणात सुमारे ५०० कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार असल्याची माहिती डब्लूआयआयकडून देण्यात आली.कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यामध्ये मदत मिळणार आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. तर काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवेदेखील अंडी घालतात. वनविभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.सागरी कासवांची गणना करण्यात येणारकेंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओईएफ) मंत्रालयाच्या ‘व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास’ (आयडीडब्लूएच) या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येचा अंदाज घेण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा, २०२१-२६’ या आरखड्यातील तरतुदीनुसार ‘डब्लूडब्लूआय’मार्फत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे.टॅगवर नमूद केलेल्या माहितीवरून त्याची ओळख‘फ्लिपर्स टॅग’ हे सर्वात सामान्य टॅग आहेत, जे जगभरात सागरी जीवांना चिन्हांकित करण्यासाठी वापरले जातात. ते धातूपासून किंवा प्लास्टिकपासून बनविलेले असतात. ते कासवाच्या कातडीला छेदून लावण्यात येतात. कासवाला पोहण्यासाठी उपयोगात येणारे एकूण चार पर असतात. ‘फ्लिपर्स टॅग’ हे पुढील दोन परांना लावले जातात. या टॅगवर विशिष्ट सांकेतिक क्रमांक असतो आणि टॅग करणाऱ्या संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक असतो. ज्यामुळे हे कासव पुन्हा सापडल्यास टॅगवर नमूद केलेल्या माहितीवरून त्याची ओळख पटविता येते.

परांवर सांकेतिक धातूची पट्टीसागरी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षाने ''डब्लूआयआय''च्या मदतीने २०२१-२२ साली एकूण सात कासवांवर ''सॅटलाइट टॅग'' बसविले होते. मात्र, काही महिन्यांमध्येच ते अकार्यान्वित झाले. याच पार्श्वभूमीवर आता कासवाच्या कवचावर ‘सॅटेलाइट टॅग’ न बसवता त्यांच्या फ्लिपरवर म्हणजे परांवर सांकेतिक धातूची पट्टी बसविण्यात येणार आहे.

दीर्घकालीन माहिती मिळण्यास मदतसमजा भविष्यात एका पराला इजा होऊन पर तुटल्यास दुसऱ्या परावरील टॅग अबाधित राहतो. ज्यामुळे माहिती मिळते. ''फ्लिपर्स टॅगिंग मुळे कासवाच्या सखोल स्थलांतराची माहिती मिळत नसली तरी, कासव कोणत्या प्रदेशातून कोणत्या प्रदेशात जात आहे, ते पुढच्या वर्षी विणीसाठी कुठे जात आहे, अशा स्वरुपाची दीर्घकालीन माहिती मिळण्यास मदत होते.

वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानच्या साहाय्याने महाराष्ट्रात हा प्रकल्प राबविणार आहोत. कांदळवन प्रतिष्ठानच्या मदतीने किनाऱ्यावर विणीसाठी येणाऱ्या मादी सागरी कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांना पकडण्यात येईल. त्यानंतर ‘फ्लिपर टॅग’ करून पुन्हा समुद्रात सोडण्यात येईल. - डॉ. आर. सुरेश कुमार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डब्लूआयआय

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग