शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्यातील 4 संशयीत पोलिसांच्या ताब्यात, कारही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 12:41 IST

परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता.

ठळक मुद्देपरब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक शिवसेना कार्यकर्ते संतोष मनोहर परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना हल्ल्यात वापरलेल्या कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी त्या हल्ल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या वेळी वापरलेली इनोव्हा कार  फोंडाघाट तपासणी नाक्यावर पोलिसांनी पकडली. तसेच त्यातील चारही संशयितांना ताब्यात घेऊन ओरोस पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. त्यानंतर स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाजा आड  कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र ,चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही.     परब यांच्यावरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब विचारपूस करत खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जखमी परब ची विचारपूस केल्याचे सांगितल्याने या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले होते. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. तर आमदार नितेश राणे यांनी राजकीय गुगली टाकत परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगत या प्रकरणात ट्विस्ट निर्माण केला होता. जिल्ह्यात सुरू असलेल्या ४ नगरपंचायत निवडणूका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान चारही आरोपींना आज (रविवारी) रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKankavliकणकवलीPoliceपोलिस