सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 99 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 251 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 325 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 322 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्याबाहेरील लॅब तिघांसह अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकूण 325 रुग्ण पॉझिटिव्हआहेत आहेत. तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आज नवीन 325 जण कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 19:14 IST
CoronaVirus Sindhdurg : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 99 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 251 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 325 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज नवीन 325 जण कोरोना बाधीत
ठळक मुद्देजिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 251जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली माहिती