शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षात २६ पर्यटक बुडाले

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

अतिउत्साहामुळे खोल पाण्यात गेल्याने आनंदावर पडते विरजण

दापोली : तालुक्यात विविध समुद्र किनाऱ्यावर सहा वर्षात २६ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने या भागातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मुरुड, केळशी, हर्णै, आंजर्ले, लाडघर, कोळथर, बुरोंडी, उटंबर, आडे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दापोलीला भेट देत असतात. पर्यटकांच्या दापोली भेटीत एकीकडे वाढ होत असतानाच अतिउत्साहामुळे आनंदावर विरजण पडण्याचे प्रकार गेल्या सहा वर्षात प्रकर्षाने घडले आहेत. मात्र, तरीही पर्यटकांच्या जलसमाधीचे अनेक प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या बहुतांश पर्यटकांना अथांग समुद्र किनारा पाहून मनमुराद पोहण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, त्यांना या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव नसल्याने पर्यटनासाठी आलेले पर्यटक सागरीकिनाऱ्याची भुरळ पडून स्नानासाठी समुद्रात उतरतात व कोणतीही कल्पना येण्याआधीच बुडतात. असे प्रकार वारंवार घडत असल्याने या किनाऱ्यावर धोकादायक ठिकाणांचा फलक लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लाईफ जॅकेट, समुद्ररक्षक व अन्य सुविधा या ठिकाणी द्याव्यात, अशी मागणी पर्यटक करीत आहेत. ओहोटीमुळे काही अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले किनारे अधिक सुरक्षित करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)