शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:26 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाचे बरसणे सुरूच आहे. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तिलारी, कर्ली सातंडी, देवधर या प्रमुख धरणांतून २३ हजार लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० धरणे पूर्णपणे भरली असून सध्या धरणांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले अनेक दिवस पावसाचे सातत्य असल्याने अनेक सकल भागांत पाणी साचून परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकजण यामुळे बाधित झाले असून कित्येकांना स्थलांतर करावे लागले आहे. अनेकांचा निवारा गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसांपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाच्या घाटांमध्ये दरड कोसळणे, महामार्गांवर, रस्त्यांवर झाडे कोसळणे, ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली जाणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. शासनाने एनडीआरएफची एक कमिटी जिल्हावासीयांच्या सेवेसाठी तैनात केली आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे महत्त्वाच्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामधून १०६०० क्युसेक, तर तिलारी जलविद्युतमधून ९६८ क्युसेस पाणीविसर्ग सुरू आहे. कर्ली सातंडी धरणातील पाण्याचा विसर्ग ११०५० क्युसेकने सुरू आहे; तर देवधर धरणातून १३५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ३५ धरणप्रकल्पांपैकी २० धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे सध्या या धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी ७५ वर पोहोचली आहे.२० धरणे १०० टक्के भरली२० धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव, कारीवडे, तीथवली यांचा समावेश आहे. तर उर्वरित धरणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसDamधरणriverनदी