शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 4:32 PM

उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.  

कणकवली :- उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. जामीन मंजूर करतानाही न्यायालयानं काही अटी-शर्थी ठेवल्या आहे. या प्रकरणात नितेश राणेंना पोलिसांना सहकार्य करावं लागणार असून, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा होणार नसल्याचीही ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दर रविवारी नितेश राणेंना हजेरी लावावी लागणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.  दरम्यान, महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपींनी जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता, न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. कणकवली येथे ४ जुलै रोजी महामार्ग दुरवस्थेवरून महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आंदोलकांनी चिखलफेक करीत गडनदी पुलाला बांधून ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. याबाबत तक्रार शेडेकर यांनी ४ जुलै रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार नितेश राणे यांच्यासह १८ स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यामध्ये कणकवली नगराध्यक्ष समीर अनंत नलावडे(४५, कणकवली ), उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड(४५, कणकवली), संजय मधुकर कामतेकर(४६, कणकवली ), राकेश बळीराम राणे(३५, कणकवली ), अभिजित भास्कर मुसळे(४२, कणकवली ), निखिल आचरेकर(३६ ,कणकवली ), राजन श्रीधर परब(५४, कणकवली ), संदीप रमाकांत सावंत (३५, वागदे), लक्ष्मण संभाजी घाडीगांवकर ( ४२, वागदे ), संदीप चंद्रकांत मेस्त्री ( ३६, कलमठ ), सदानंद उर्फ बबन गोविंद हळदिवे(६०, फोंडाघाट), किशोर जगन्नाथ राणे(५२, कणकवली ), शिवसुंदर शाहू देसाई(२४, कणकवली), सचिन गुणाजी पारधिये(३६, कळसुली ), विठ्ठल दत्ताराम देसाई(५५, कणकवली), मिलिंद चंद्रकांत मेस्त्री(३५, कलमठ ), संदीप बाळकृष्ण नलावडे(३६, कणकवली ) यांचा समावेश होता.तर माजी नगराध्यक्षा मेघा अजय गांगण (४२, कणकवली ) यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती. या १९ जणांवर शासकीय कामात अडथळा, कटकारस्थान रचणे, रस्ता अडविणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. ५ जुलै रोजी आमदार नितेश यांच्यासह अटकेतील सर्व आंदोलकांना कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्व संशयितांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे