शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६ मुले-मुली अजूनही बेपत्ताच!

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

‘आॅपरेशन मुस्कान’ : सात अल्पवयीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश

सिंधुदुर्गनगरी : हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत अद्यापपर्यंत सात अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २00५ पासून ३0 जून २0१५ या काळात बेपत्ता झालेले किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींना शोधणे सुरू आहे. या काळात अपहरण झालेले किंवा बेपत्ता झालेल्यांमध्ये १६ बालके असून यात १३ मुले तर ३ मुलींचा समावेश आहे.मुलींच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भिक मागविणे तर काहींना वाम मार्गाकडे वळविले जाते. यासाठी अल्पवयीन मुला मुलींचे अपहरण होते. १८ वर्षाखालील बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आई वडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधून ही कार्यवाही सुरू असून जुलै अखेरपर्र्यत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांपैकी काही मुले त्यांच्या पालकांकडे परत आले असल्यास त्यांची खात्री करून त्याबाबतची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी समन्वय ठेऊन हरविलेल्या बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, चौक, रेल्वेस्टेशन व सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालून या अशा मुलांचा शोध घेत आहेत. हरविलेल्या किंवा घरातून निघून गेलेली मुले-मुली सापडल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जात आहे. जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींचे किंवा बेपत्ता होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. गेल्या सन २00५ पासून ३0 जून २0१५ पर्यंत २३ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हेच प्रमाण शेकडो, हजारोंच्या घरात आहे. बेपत्ता झालेल्या या २३ मुलांपैकी ७ मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्यापही १६ मुले-मुली बेपत्ताच आहे. (प्रतिनिधी)सापडलेल्यांमध्ये सातही मुलींचा समावेशआॅपरेशन मुस्कान राबविल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला काही प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे शोध लागलेल्यांमध्ये सातही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या अल्पवयीन मुलींचे वय वर्षे १७, १६, १५, १४ अशी असल्याचे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील पाच संबंधित मुलींना पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.तर उर्वरीत दोन मुलींना वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. या अल्पवयीन मुली फिरताना पोलिसांना आढळून आल्या. रेल्वेस्टेशन, बसस्थानक या परिसरात या मुली आढळून आल्या आहेत. या मुली बांदा, कणकवली, दोडामार्ग, वैभववाडी येथे सापडल्या आहेत.२४ दिवसात ७ बालके मिळालीसिंधुदुर्ग पोलिसांनी १ जुलैपासून आॅपरेशन मुस्कान सुरू केले आहे. या अभियानात गेल्या २४ दिवसात ७ मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी राबविलेल्या या मोहिमेचे हे फलित आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.