शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: इन्कमटॅक्स'मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडीची भीती दाखवत घातला १३ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:51 IST

विविध बँक खात्यात भरणा : सायबर सेलकडे तक्रार  

बांदा : इन्कमटॅक्स विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ईडी कारवाईची भीती दाखवत तब्बल १३ लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित अधिकाऱ्याने संशयिताच्या सांगण्यावरून पूर्ण रक्कम धनादेशाच्या माध्यमातून तीन विविध बँक खात्यात गेल्या आठ दिवसांत भरणा केली.सोमवारी, ३ मार्च रोजी सुद्धा ते उर्वरित चार लाख रुपये बँकेत भरण्याच्या तयारीत होते; मात्र तत्पूर्वी त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी सायंकाळी उशिरा बांदा पोलिस ठाणे गाठले. सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ते निवृत्त अधिकारी बांदा दशक्रोशीतील आहेत. ते अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने  आपल्या गावी मुक्कामी आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांना ईडी अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या मोबाईलवर फेक कॉल आला. आपण ज्या कार्यालयात सेवा केली त्या सेवेच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली आहे. त्यात आपण दोषी असल्याचे समोर येत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तसेच गैरव्यवहार झालेली रक्कम तत्काळ भरावी असे बजाविले. या फेक कॉलमुळे संबंधित अधिकारी भयभीत झाले.यावेळी त्यांनी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. एकूण १७ लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. संबंधित व्यक्तीने त्यांना चेकच्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगून विविध बँक खात्यांची माहिती पाठविली. त्यांनी गेल्या आठ दिवसात विविध बँक खात्यातून तब्बल १३ लाख रुपये वर्ग केले.उर्वरित चार लाख रुपये  सोमवारी बँकेच्या खात्यात भरणार होते; मात्र त्यांना  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी बांदा पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९०३ या नंबरवर ऑनलाईन तक्रार दाखल केली.

सायबर गुन्ह्याबाबत सध्या पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे.  अशा गुन्ह्याबाबत सर्वांनी सावध रहावे. अनोळखी फोन कॉल किंवा मेसेज लिंकला उत्तर देऊ नका. पैसे मागण्यासाठी फोन आल्यास याची कल्पना   पोलिसांना द्यावी. फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली आहे. - विकास बडवे, बांदा पोलिस निरीक्षक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIncome Taxइन्कम टॅक्सEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी