सखी: कषाय चहा: आरोग्यदायी आयुर्वेदिक चहा रेसिपी
कषाय चहा म्हणजे धणे, जिरे, काळी मिरी, सुंठ आणि लवंग वापरून बनवलेला आयुर्वेदिक चहा! सर्दी-खोकल्यावर गुणकारी आणि चविष्ट! बनवायला सोपा! कषाय हा चहाचा एक प्रकार आहे जो आरोग्यासाठी फार फायद्याचा ठरतो. थंडीच्या दिवसांत हा चहा रोज प्या,आरोग्य मस्त राहील. कषाय चहा नक्की ट्राय करा!
फिल्मी: थलापती विजयच्या दणदणीत विजयानंतर राम गोपाल वर्मांची पोस्ट, शेअर केला 'तो' दुर्मिळ फोटो
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजयने ऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला. विजयच्या दणदणीत विजयानंतर लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. राम गोपाल वर्मांनी विजयचा दिवंगत महान राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे.
राष्ट्रीय: TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
West Bengal Assembly Election 2026 : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करत, तिकीटासाठी मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा दावाही केला आहे.
राष्ट्रीय: काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Assembly Election 2026 : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये मुस्लिम नेत्यांचे लक्षणीय प्रमाण दिसून आले आहे. आसाम, केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांतील आकडेवारीत हा ट्रेंड स्पष्टपणे जाणवतोय.
व्यापार: शेअर बाजारावर दबाव कायम; सेन्सेक्स २५२ अंकांनी घसरला, रुपया विक्रमी नीचांकीवर
Share Market: शेअर बाजारावर मंगळवारी दबाव कायम राहिला. BSE Sensex २५१.६१ अंकांनी घसरून ७७,०१७.७९ वर बंद झाला, तर Nifty 50 ८६.५० अंकांनी घसरत २४,०३२.८० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्स सुमारे ७५० अंकांपर्यंत कोसळला होता; मात्र शेवटी काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली.
राष्ट्रीय: निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; राजीनामा देण्यास नकार
निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गैरव्यवहाराचा आरोप केला. पराभव होऊनही, सोनिया गांधी, केजरीवाल यांसारख्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या पाठिंब्याचे हवाला देत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. बनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा आरोप करत लढण्याची शपथ घेतली.
सांगली: पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत; सांगलीत ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
संगीतकार पलाश मुच्छल यांच्यावर विज्ञान माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. चित्रपटातील गुंतवणुकीवरून वाद. यापूर्वी क्रिकेटपटू स्मृती मानधनासोबतचे लग्न रद्द झाले आणि फसवणुकीचे आरोप झाले होते.
बीड: बीड हादरले: पत्नी नांदायला येईना म्हणून बापाने मुलींना पेटवले!
माजलगावात पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका पित्याने आपल्या दोन लहान मुलींना डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय: बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षा (BJP) ने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्मय महत्वाचा ठरणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
व्यापार: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घट पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर आता १,४८,००० रुपयांच्या खाली आला आहे. बुलियन्स मार्केटमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४७,५५७ रुपये झालाय. सोमवारी सकाळी हा दर १,४८,३५७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर ८०० रुपयांनी घसरलेत.
व्यापार: आज उघडला हा ₹३४०५ कोटींचा IPO; झुनझुनवाला ट्रस्टनेही केली मोठी गुंतवणूक, जाणून घ्या प्राइस बँड
Bagmane Prime Office REIT IPO: बंगळुरूच्या प्राइम ऑफिस स्पेस मार्केटमधील आघाडीची कंपनी Bagmane Prime Office REIT चा IPO आज (५ मे) पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. मजबूत पोर्टफोलिओ आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा पाठिंब्यामुळे या इश्यूकडे बाजाराचे विशेष लक्ष लागले आहे.
व्यापार: किरण मजुमदार-शॉ यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची केली निवड
भारतातील आघाडीची बायोटेक्नॉलॉजी कंपनी 'बायोकॉन'च्या (Biocon) भविष्याबाबत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या संस्थापक आणि चेअरपर्सन किरण मजुमदार-शॉ यांनी त्यांची पुतणी क्लेअर मजुमदार यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलंय. 'फॉर्च्यून इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
व्यापार: महिंद्राची दमदार कामगिरी: Q4 नफ्यात ४२% वाढ, लाभांश जाहीर
महिंद्रा अँड महिंद्राच्या Q4 मध्ये ४२% वाढीसह ₹४,६६८ कोटींचा नफा झाला. SUV आणि ट्रॅक्टर विक्रीमुळे महसूल २९% वाढला. भागधारकांना प्रति शेअर ₹३३ लाभांश मिळणार. स्टँडअलोन नफा ५३.३% नी वाढला.
व्यापार: CEO इतकी कमाई करण्यासाठी कर्मचाऱ्याला ४९० वर्षे लागतील! ५ जन्म काम करावे लागेल
जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील वेतन विषमतेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनल (OI) आणि इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फडरेशन (ITUC) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२५ मध्ये जागतिक स्तरावर टॉप CEO यांच्या पगारात कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल २० पट वेगाने वाढ झाली आहे.
व्यापार: बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; कोणाचा अन् किती पगार वाढणार? जाणून घ्या...
बँकिंग क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने मे ते जुलै २०२६ या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) किरकोळ वाढ जाहीर केली आहे. मात्र, ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी आणि संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. नवीन निर्णयानुसार, महागाई भत्ता २५ टक्क्यांवरून २५.७० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच DA मध्ये केवळ ०.७० टक्क्यांची वाढ झाली आहे.
व्यापार: विमानांना धावपट्टीवर चालवण्यासाठी पायलटला देणार ९५ लाखांचा पगार
जेव्हाही पायलट शब्द डोळ्यासमोर येतो, तेव्हा एक प्रतिमा तयार होते. ती म्हणजे तो विमान उडवतो आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जातो. पण विचार करा, असाही एखादा पायलट असू शकतो का जो विमान उडवणारच नाही, तरीही एअरलाईन्स त्याला लाखो रुपयांचा पगार देईल? ब्रिटिश एअरवेजनं अशाच पायलटांसाठी व्हेकन्सी काढली आहे.
मुंबई: हल्ल्यात कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
गजबज असलेल्या सायन रुग्णालयात शनिवारी एक जखमी व्यक्ती बघून सगळेच हादरले. एक तरुण उभा होता, त्याच्या डोक्यात कोयता अडकलेला होता. उपचारासाठी वाट बघत असलेला तरुण मोबाईल बघत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर आली.
व्यापार: सोनं महाग, चांदी स्वस्त; पाहा काय आहेत आजचे दर?
सोने चांदीच्या किमतीत ०५ मे २०२६ (मंगळवार) रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज जिथे सोन्याच्या भावात किरकोळ तेजी दिसत आहे, तिथेच चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण नोंदवली गेली. कालच चांदीच्या किमतीत ७,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली होती. कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उताराचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसत आहे.
व्यापार: इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; पेट्रोल-डिझेलचे दर काय?
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीनं (UAE) दावा केला आहे की इराणनं त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागलीत. या घटनेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑईल १०५ डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड ऑईल ११४ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेलंय.
महाराष्ट्र: मीरा बोरवणकर राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड?; व्हायरल पोस्टचं सत्य
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकजण या बातमीचा हवाला देत त्यांचे अभिनंदन करत आहेत. परंतु अशाप्रकारे कुठलीही निवड करण्यात आली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त आहे अद्याप या पदावर कुणाचीही निवड झाली नाही.
नाशिक: अशोक खरातला फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडी
फसवणूक करणारा अशोक खरात याला नवव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. अवताराच्या पूजेच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी उकळले. शिर्डी पोलिसांनी जमीन फसवणूक व खाजगी सावकारी प्रकरणात ताब्यात घेतले; तपास सुरू आहे.
राष्ट्रीय: घरकाम करणारी महिला बनली आमदार: भाजपाने कलिता माझीला दिली होती संधी
भाजपच्या कलिता माझी या तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांचा पराभव करत आमदार बनल्या. औसाग्राम मतदारसंघातून भाजपाने घरकाम करणाऱ्या कलिता माझी यांना उमेदवारी दिली होती. मागील निवडणुकीतही त्या उभ्या होत्या, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु यंदा भाजपाने पुन्हा कलिता यांच्यावर विश्वास दाखवला आणि हा विश्वास कलिता यांनी सार्थ ठरवला. त्यांच्या विजयाने अनेकांना आश्चर्यचकीत केले.
क्रिकेट: IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीच्या सुपर हिट शोच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सने दिलेल्या विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत नवा इतिहास रचला आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सपाठोपाठ आता लखनौच्या संघाचीही स्वबळावर प्लेऑफ्स तिकीट मिळवण्याची आशा संपुष्टात आली आहे.
व्यापार: SBI, BOI ते PNB..; कोणती सरकारी बँक सर्वात स्वस्त पर्सनल लोन देते? जाणून घ्या...
दैनंदिन गरजा, वैद्यकीय खर्च किंवा इतर आर्थिक अडचणींसाठी पर्सनल लोन हा एक सोयीचा पर्याय मानला जातो. योग्य नियोजनासह घेतलेले कर्ज आर्थिक ताण कमी करू शकते. देशभरात आजही सरकारी बँका कमी व्याजदर, पारदर्शक अटी आणि विश्वासार्हतेमुळे ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहेत. मे २०२६ मध्ये अनेक सरकारी बँकांनी पर्सनल लोनवर स्पर्धात्मक दर जाहीर केले असून, मोठ्या रकमेसाठीही कर्ज तुलनेने स्वस्तात उपलब्ध होत आहे.
राष्ट्रीय: गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
नवी दिल्ली: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत विजयाचे श्रेय त्यांच्या दीर्घकाळाच्या परिश्रमांना दिले. पश्चिम बंगालमधील भाजपची ही ऐतिहासिक कामगिरी अनेक पिढ्यांपासून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाली आहे. मी सर्वांना सलाम करतो, असे उद्गार पीएम मोदींनी काढले.
व्यापार: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या २४ कॅरेट सोन्याची किंमत
आज(दि.४) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत सोने १,९०६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे दर कमी झाल्याने भारतीयांना दिलासा मिळाला.
व्यापार: ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक, कसा होता लक्ष्मी मित्तल यांचा प्रवास?
IPL च्या इतिहासात रविवारी एक मोठा करार करण्यात आला. दिग्गज उद्योजक लक्ष्मी मित्तल आणि त्यांचा मुलगा आदित्य मित्तल यांनी अदर पूनावाला यांच्यासोबत मिळून राजस्थान रॉयल्ससाठी १.६५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. मित्तल कुटुंबीयांकडे या टीमचा सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के हिस्सा आहे. राजस्थानच्या एका छोट्या ठिकाणाहून बाहेर पडून स्टीक कंपनी उभी करणारे आर्सेलर मित्तल आज अब्जावधींचे मालक आहेत.
व्यापार: ३० वर्षांत पहिल्यांदाच घडले! एप्रिल महिन्यात कुवेतने तेलाचा एकही बॅरल निर्यात केला नाही, कारण काय?
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टँकर ट्रॅकर्सच्या अहवालानुसार, कुवैतने एप्रिल २०२६ मध्ये कच्च्या तेलाचा एकही बॅरल निर्यात केलेला नाही. गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच कुवैतसाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या वृत्ताची अधिकृत पुष्टी झाली, तर १९९१ मधील खाडी युद्धानंतर कुवैतच्या इतिहासात पहिल्यांदाच मासिक कच्च्या तेलाची निर्यात शून्यावर आल्याची नोंद होईल.
राष्ट्रीय: थलापतीचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीचे निकाल आज(दि.४) लागत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, सत्ताधारी DMK ला जोरदार धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांच्या TVK पक्षाने १०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.
व्यापार: थलापति विजय : अभिनेता, राजकारणी आणि ६०० कोटींच्या साम्राज्याचे मालक, कशी आहे लक्झरी लाईफ?
अभिनेता-राजकारणी थलापति विजय, TVK चे प्रमुख, यांनी निवडणुकीपूर्वी ६०० कोटींहून अधिकची संपत्ती जाहीर केली. ते पेरंबूर आणि तिरुचिरापल्लीतून निवडणूक लढवत आहेत. विजयची संपत्ती चित्रपट, जाहिरात आणि रिअल इस्टेटमधून आहे. त्यांची पत्नी संगीता यांच्याकडेही मोठी मालमत्ता आहे, जी त्यांच्या राजकीय प्रभावाला बळकटी देते.
राष्ट्रीय: भाजपला तीन राज्यांमध्ये यश पण दोन राज्यांत फक्त ५ जागांवर आघाडी
भाजपला आसाम, बंगालमध्ये मोठं यश मिळालं असलं तरी तामिळनाडू, केरळात निराशा झाली आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्यावेळीपेक्षा केवळ पाच जागांवरच भाजपला आघाडी मिळाली आहे.