Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; कोणाचा अन् किती पगार वाढणार? जाणून घ्या...

बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; कोणाचा अन् किती पगार वाढणार? जाणून घ्या...

DA Hike News: सरकारने मे से जुलै २०२६ या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:28 IST2026-05-05T13:27:04+5:302026-05-05T13:28:15+5:30

DA Hike News: सरकारने मे से जुलै २०२६ या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.

DA Hike News: Increase in dearness allowance for bank employees; Whose salary will increase and by how much? Find out | बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; कोणाचा अन् किती पगार वाढणार? जाणून घ्या...

बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; कोणाचा अन् किती पगार वाढणार? जाणून घ्या...

DA Hike News: बँकिंग क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने मे ते जुलै २०२६ या तिमाहीसाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) किरकोळ वाढ जाहीर केली आहे. मात्र, ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी आणि संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

किती वाढला DA?

नवीन निर्णयानुसार, महागाई भत्ता २५ टक्क्यांवरून २५.७० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच DA मध्ये केवळ ०.७० टक्क्यांची वाढ झाली आहे.

पगारावर काय परिणाम?

या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार असला तरी वाढ मर्यादितच आहे. विविध वेतनमानानुसार, पगारात सुमारे ४३५ रुपये ते १,०५० रुपयांपर्यंतच वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ४८,००० ते १,१७,००० रुपयांच्या दरम्यान आहे, त्यांनाच या वाढीचा लाभ मिळणार आहे.

वेतनानुसार वाढ 

  • स्टेज १ (Basic ₹४८,४८०): सुमारे ₹४३५ प्रति महिना वाढ
  • स्टेज १० (Basic ₹६७,१६०): सुमारे ₹६०१ प्रति महिना वाढ
  • स्टेज २० (Basic ₹९३,९६०): सुमारे ₹८३८ प्रति महिना वाढ
  • स्टेज २५ (Basic ₹१,०८,२६०): सुमारे ₹९६५ प्रति महिना वाढ

गणना कशी केली?

ही वाढ Indian Banks' Association (IBA) च्या २ मे २०२६ च्या अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे. महागाई भत्त्याचे दर औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर (AIACPI-IW) आधारित असतात.

CPI डेटा काय सांगतो?

२०२६ च्या पहिल्या तिमाहीतील CPI आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

जानेवारी २०२६: १४८.६
फेब्रुवारी २०२६: १४८.५
मार्च २०२६: १४९.१

या तीन महिन्यांचा सरासरी निर्देशांक १४८.७३ इतका आहे. २०१६ च्या १२३.०३ या बेस इंडेक्सच्या तुलनेत हा फरक २५.७० इतका येतो. त्यामुळे मे-जुलै २०२६ या कालावधीसाठी DA वाढ ०.७० टक्के निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, DA मधील वाढ अत्यंत मर्यादित असल्याने अनेक कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाढती महागाई लक्षात घेता अधिक मोठ्या वाढीची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

Web Title : बैंक कर्मचारियों के महंगाई भत्ते में वृद्धि: वेतन वृद्धि का विवरण

Web Summary : मई-जुलाई 2026 के लिए बैंक कर्मचारियों के महंगाई भत्ते में 0.70% की वृद्धि, वेतन पर प्रभाव। सीपीआई इंडेक्स के आधार पर, वेतनमान के अनुसार ₹435 से ₹1,050 तक सीमित वृद्धि, कुछ यूनियनों को निराशा।

Web Title : Bank Employees' DA Hike: Salary Increase Details Revealed

Web Summary : Bank employees' DA increased by 0.70% for May-July 2026, impacting salaries. The hike, based on the CPI index, results in a limited increase, ranging from ₹435 to ₹1,050 depending on the pay scale, disappointing some unions.