Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > महिंद्राची दमदार कामगिरी; Q4 नफ्यात ४२% वाढ; भागधारकांना प्रति शेअर मिळणार घवघवीत लाभांश

महिंद्राची दमदार कामगिरी; Q4 नफ्यात ४२% वाढ; भागधारकांना प्रति शेअर मिळणार घवघवीत लाभांश

महिंद्राच्या थार, स्कॉर्पिओ आणि XUV सारख्या SUV गाड्यांची वाढती मागणी हा या वाढीमागील प्रमुख घटक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:25 IST2026-05-05T14:24:50+5:302026-05-05T14:25:40+5:30

महिंद्राच्या थार, स्कॉर्पिओ आणि XUV सारख्या SUV गाड्यांची वाढती मागणी हा या वाढीमागील प्रमुख घटक ठरला.

Mahindra and Mahindra; 42% increase in Q4 profit; Shareholders will get a hefty dividend per share | महिंद्राची दमदार कामगिरी; Q4 नफ्यात ४२% वाढ; भागधारकांना प्रति शेअर मिळणार घवघवीत लाभांश

महिंद्राची दमदार कामगिरी; Q4 नफ्यात ४२% वाढ; भागधारकांना प्रति शेअर मिळणार घवघवीत लाभांश

Mahindra & Mahindra Q4 Result: देशातील आघाडीची वाहन उत्पादक महिंद्राने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. मजबूत मागणी, विशेषतः SUV आणि ट्रॅक्टर सेगमेंटमधील विक्रीच्या जोरावर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर ४२% वाढून ₹४,६६८ कोटींवर पोहोचला आहे.

उत्पन्न आणि नफ्यात विक्रमी वाढ

कंपनीचा निव्वळ नफा ₹३,२९५ कोटींवरून वाढून ₹४,६६८ कोटी (४२% वाढ) झाला, तर एकूण महसूल ₹४२,५९९ कोटींवरून वाढून ₹५४,९८२ कोटी (२९% वाढ) वर पोहोचले. यात प्रॉफिट मार्जिन ७.७% वरून वाढून ८.५% वर गेली. कंपनीच्या या कामगिरीत ऑपरेशनल सुधारणा आणि वाढती मागणी यांचा मोठा वाटा आहे.

स्टँडअलोन नफाही अपेक्षेपेक्षा जास्त

मुख्य कंपनीचा नफा तब्बल ५३.३% वाढून ₹३,७३७ कोटी झाला आहे. हा आकडा बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजांपेक्षा जास्त असल्याने गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

गुंतवणूकदारांना प्रति शेअर ₹३३ लाभांश

निकाल जाहीर करताना कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ₹३३ प्रति शेअर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कोणत्या सेगमेंटने दिला सर्वाधिक हातभार?

१) ऑटोमोबाइल (SUV) व्यवसाय
महसूल: ₹३४,२९४ कोटी (३२% वाढ)
नफा (PAT): ₹२,५५३ कोटी (४९% वाढ)
विक्री: ३.०७ लाख वाहने

महिंद्राच्या थार, स्कॉर्पिओ आणि XUV सारख्या SUV गाड्यांची वाढती मागणी हा या वाढीमागील प्रमुख घटक ठरला.

२) फार्म इक्विपमेंट (ट्रॅक्टर)

महसूल: ₹१०,०२२ कोटी (२६% वाढ)
विक्री: १.२० लाख ट्रॅक्टर (३६% वाढ)

कृषी क्षेत्रातील मजबूत मागणीमुळे या सेगमेंटनेही उत्कृष्ट कामगिरी केली.

३) सर्व्हिस व्यवसाय

महसूल: ₹१२,१४७ कोटी (२३% वाढ)
नफा: ₹१,३४८ कोटी (६४% वाढ)

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
 

Web Title : महिंद्रा का दमदार प्रदर्शन: Q4 मुनाफ़ा 42% बढ़ा, लाभांश घोषित

Web Summary : महिंद्रा एंड महिंद्रा ने Q4 में 42% की वृद्धि के साथ ₹4,668 करोड़ का शुद्ध लाभ दर्ज किया। एसयूवी और ट्रैक्टर की बिक्री में वृद्धि से राजस्व 29% बढ़ा। शेयरधारकों को ₹33 प्रति शेयर लाभांश मिलेगा। स्टैंडअलोन लाभ 53.3% बढ़ा।

Web Title : Mahindra's Strong Performance: Q4 Profit Surges 42%, Dividend Announced

Web Summary : Mahindra & Mahindra reports a robust 42% jump in Q4 net profit, reaching ₹4,668 crore. Revenue rose 29%, fueled by strong SUV and tractor sales. Shareholders will receive ₹33 per share dividend. Standalone profit increased by 53.3%.