लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'ही' समस्या येत असेल तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:39 PM2019-06-08T15:39:11+5:302019-06-08T15:41:01+5:30

या समस्येमुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनावरच नाही तर त्यांच्या भावनिक नात्यावरही प्रभाव पडतो.

What to do for erection problem | लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'ही' समस्या येत असेल तर काय कराल?

लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'ही' समस्या येत असेल तर काय कराल?

Next

(Image Credit : navbharattimes.indiatimes.co)

शारीरिक संबंधादरम्यान अनेक पुरूषांना इरेक्शन(ताठरता)संबंधी समस्या होते. या समस्येची वेगवेगळी कारणे असू शकतात. या समस्येमुळे दोन्ही व्यक्तींच्या लैंगिक जीवनावरच नाही तर त्यांच्या भावनिक नात्यावरही प्रभाव पडतो. या कारणे पुरूषांमध्ये स्ट्रेसही अधिक वाढतो. तसेच नात्यात नकारात्मकताही येऊ लागते. चला जाणून इरेक्शसंबंधी समस्या आली तर काय करावे.

जाणून घ्या कारण

इरेक्शनमध्ये अडचण येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ही कारणे तुमची लाइफस्टाईल, स्ट्रेस, मेडिकल किंवा सिच्युएशनल व स्थितीशी संबंधित असू शकतात. ही समस्या जर दूर करायची असेल तर आधी कारण शोधलं पाहिजे.

लाइफस्टाईलशी संबंधित कारणे

पौष्टीक आहार न घेणे, झोप पुरेशी न होणे, एक्सरसाइज न करणे, स्मोकिंग इत्यादी लाइफस्टाईलशी निगडीत सवयी सेक्स ड्राइव्हला प्रभावित करण्यासोबतच इरेक्शनमध्येही समस्या निर्माण करतात. ही समस्या सोडवण्यासाठी पौष्टीक आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम करणे हे चांगले पर्याय ठरू शकतात. याने तुम्हाला काही दिवसात फरक बघायला मिळेल.

स्ट्रेस

कामाचं फार जास्त ओझं असो वा मेंदूवर जर एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस असेल तर याचाही शरीरावर वाईट प्रभाव पडतो. अशात इरेक्शनसंबंधी समस्या होते. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगाचा आधार घ्या किंवा इतरही काही उपायांच्या मदतीने तुम्ही स्ट्रेस दूर करू शकता. 

सिच्युएशनल

इरेक्शनची समस्या सिच्युएशनलही असू शकते. बेडरूमची सेंटींग, शारीरिक संबंधावेळील पार्टनरची एखादी सवय, खोलीचं तापमान यांसारख्या स्थितीत तुम्हाला सहज वाटेलच असं नाही. यामुळेही इरेक्शनमध्ये समस्या येऊ शकते.

रिलेशनशिपमध्ये अडचण

तुमच्यात आणि पार्टनरमध्ये काही समस्या सुरू असेल तर इच्छा असूनही तुम्ही उत्साही होऊ शकत नाही. अशात काऊन्सेलिंगचा आधार घेऊ शकता. नातं सुधारलं तर इच्छांमध्येही बदल बघायला मिळतो.

मेडिकल प्रॉब्लेम

इरेक्शनची समस्या कोणत्याही शारीरिक समस्येमुळेही येऊ शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. काही टेस्ट केल्यावर किंवा थेरपींच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जाऊ शकते.

Web Title: What to do for erection problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.