शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

लैंगिक जीवनः 'या' सवयी बदला; अन्यथा शुक्राणूंची संख्या घटेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:44 IST

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टइलमध्ये अनेक पुरुषांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टइलमध्ये अनेक पुरुषांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या आजारांचा लैंगिक जीवनावर फारच वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पती-पत्नी तणावातही येतात. स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी असणे आणि त्यामुळे गर्भधारणा न होणे, लैंगिक क्षमता नसणे या समस्या अलिकडे फारच भेडसावत आहे. 

जसं जसं वय वाढतं तसतसा टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो. ही तशी सामान्य बाब मानली जाते. पण अलिकडे कमी वयातही शुक्राणूंची संख्या कामी होणे ही गंभीर बाब होत आहे. आणि मेल हार्मोनमध्ये कमतरता आल्याने वेगवेगळ्या आजारांचाही सामना करावा लागतो. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे केवळ डायबिटीज, हृदयरोग आणि थकवा याच समस्या नाही तर कामेच्छा कमी असणे ही सुद्धा समस्या निर्माण होते. तुमच्या शरीरातील शुक्राणूंचं प्रमाण कमी असल्याचं केवळ एका सामान्य रक्ताच्या चाचणीतून माहिती करुन घेता येतं. पण त्यासोबतच जर तुम्ही तुमच्या काही सवयी सुधारल्या तर तुम्हाला ही समस्या होणारच नाही. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या सवयी ज्यामुळे तुमच्या शुक्राणूंमध्ये कमतरता येते.

गरम पाण्याने आंघोळ

भलेही गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल पण याने शुक्राणूंची संख्या कमी होते. कारण शुक्राणु जास्त तापमान सहन करु शकत नाही. त्यामुळे ते नष्ट होऊ लागतात. 

टाईट अंडरवेअर

अनेकजण फार जास्त टाईट असलेल्या अंडरवेअरचा वापर करातत. त्यामुळे शरीरातील अंडकोषाचं तापमान वाढतं. याने शुक्राणूंचं नुकसान होतं. त्यामुळे सैल अंडरवेअर वापरण्यास सुरुवात करा. 

मोबाइल फोन

जे लोक मोबाइल दिवसभर पॅंटच्या खिशात मोबाइल ठेवून फिरतात त्यांची वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण मोबाइलमधून निघणारे रेडिएशन पुरुषांच्या शुक्राणूंवर फार जास्त प्रभाव पडतो.

जास्त स्ट्रेस

जास्त मानसिक तणाव घेतल्याने पुरुषांच्या टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होतो. याचा थेट प्रभाव त्यांच्या लैंगिक जीवनावर पडतो. त्यामुळे तणावाला दूर ठेवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करा.

मद्यसेवन

अधिक प्रमाणात मद्यसेवन केल्याने पुरुषांची कामेच्छा तर कमी होतेच. सोबतच शुक्राणूंची संख्याही घटते. त्यामुळे मद्यसेवन न करणे हाच उपाय आहे. 

स्मोकिंग

जे लोक सतत सिगारेट ओढतात त्यांनीही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. याने शरीरातील कॅडमियम डीएनएला इजा होते आणि त्या कारणाने शुक्राणूंची संख्या कमी होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यrelationshipरिलेशनशिप