Shocking myths and facts about nightfall right from penis size to sperms | लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज!

लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज!

(Image Credit : Medical News Today)

नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोष....ही एक अशी समस्या आहे जी तरूणांमधील सर्वात कॉमन समस्या आहे. यामुळे तरूण मंडळी चिंतेतही असते. अनेकदा ते याबाबत कुणाला काही सांगतही नाहीत. नाइटफॉल ही एक अशी समस्या आहे, ज्यात झोपेत एखादं इरॉटिक स्वप्न पाहिल्याने किंवा विचार करत इजॅक्यूलेशन होतं. आज आम्ही तुम्हाला नाइटफॉलबाबत काही समज-गैरसमज सांगणार आहोत.

केवळ पुरूषांनाच होतो

अनेक लोकांचा असा समज असतो की, स्वप्नदोष केवळ पुरूषांमध्येच असतो. पण असं नाहीय. महिलांनाही याचा अनुभव येतो, ज्यामुळे त्यांना ऑर्गॅज्म होतो.

स्पर्म काउंट होतात कमी? 

जास्तीत जास्त लोकांचं असं मत आहे की, स्वप्नदोषामुळे स्पर्म काउंट कमी होतो. मात्र, तज्ज्ञांनुसार, स्वप्नदोष ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यात टेस्टिकल्स जुने स्पर्म बाहेर काढतो, जेणेकरून नवीन हेल्दी स्पर्म तयार व्हावे.

लैंगिक जीवनावर वाईट प्रभाव?

असं अजिबातच नाहीये. स्वप्नदोषामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर काहीच वाईट प्रभाव पडत नाही. तसेच याने इरेक्शन(ताठरता) संबंधीही कोणती समस्या होत नाही. 

स्वप्नदोषामुळे लिंग आक्रसतं?

अनेकांचा असा समज आहे की, स्वप्नदोषामुळे लिंग आक्रसतं. पण असं नाहीये. एक्सपर्ट्स सांगतात की, स्वप्नदोषामुळे लिंग आक्रसत नाही. तसेच सेक्शुअल हेल्थ मेल सेक्स ऑर्गनवर अवलंबून नसते.

स्वप्नदोष केवळ तारूण्यात

स्वप्नदोषाची समस्या केवळ तारूण्यातच होते असं नाही, तर त्यानंतरही हा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. मात्र, तारूण्यात ही अधिक जास्त बघायला मिळते. कारण त्यावेळी हार्मोन्समध्ये वेगाने बदल होत असतो.

स्वप्नदोषामुळे आजार

काही तरूण विचार करतात की, स्वप्नदोषामुळे त्यांना पुढे जाऊन काहीतरी आजार होईल. पण असं अजिबातच नाहीय. ही एक सामान्य प्रक्रिया असून जुने स्पर्म निघून जातात आणि नवीन हेल्दी स्पर्म तयार होतात. 

Web Title: Shocking myths and facts about nightfall right from penis size to sperms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.