शारीरिक संबंधात दिवसेंदिवस कमतरता येत असेल किंवा तुम्ही इच्छा असूनही हवं तसं परफॉर्म करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. लोक लैंगिक क्षमता किंवा ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. पण या औषधांचा वापर न करताही तुम्ही तुमची लैंगिक क्षमता वाढवू शकता. 

सफरचंद ठरेल फायदेशीर

एक्सपर्ट्सही औषधांचा वापर करण्याचा सल्ला देण्याऐवजी आहारावर अधिक लक्ष देण्यासाठी सांगतात. त्यात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करण्यास सांगतात. तुम्ही रोज एक सफरचंद खाल तुम्हाला कमजोरीचं औषध घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. सफरचंदचा फायदा आरोग्याला तर होतोच, सोबतच तुमच्या सेक्शुअल हेल्थलाही फायदा होतो. सफरचंद खाल्ल्याने लैंगिक क्षमता वाढते.  त्यामुळे रोज एक सफरचंद खाण्याची सवय लावावी.

लसणाने वाढवा पॉवर

तुम्हाला हे कुठे ऐकायला मिळालं नसेल पण वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाच्या नियमित सेवनाने लैंगिक पॉवर वाढते. प्रायव्हेट पार्ट्सच्या नसा स्ट्रॉंग करण्यासाठी याने मदत मिळते. तसेच इरेक्शनसोबतच उशीरापर्यंत परफॉर्म करण्यासही मदत मिळते. मात्र, लसणाचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला महागातही पडू शकतं.

आल्याचा असा करा वापर

आल्याचा चहा आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो हे तुम्हाला माहीत आहेच. पण अनेकांना हे माहीत नसेल की, आल्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. ब्लड सर्कुलेशन वाढलं की, शरीराला एनर्जी मिळते. आणि तुमचा बेडवरील परफॉर्मन्सही चांगला होतो.

यानेही होतो अधिक फायदा

(Image Credit : amansquest.com)

जर तुम्हाला योगाभ्यास करणं पसंत नसेल तर तुम्ही थोडा वेळ काढून रनिंग आणि वॉक करू शकता. याने पेल्विक मसल्स(ओटी पोटाजवळील भाग) मजबूत होतात. या भागात ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि हृदय निरोगी राहतं. जेव्हा या तिन्ही गोष्टी तुम्हाला साथ देतात, तेव्हा शारीरिक संबंधावेळी तुमचा परफॉर्मन्सही चांगला होतो.

हे टाळाच...

(Image Credit : psychologytoday.com)

आतापर्यंत तुम्ही हे जाणून घेतलं की, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावं. आता हे जाणून घ्या की, काय करू नये. अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा तुमच्या लैंगिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. यातील सर्वात पहिलं आहे स्ट्रेस म्हणजेच तणाव. मन शांत ठेवण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष द्या. सोबतच मद्यसेवन बंद करा. याने तुमचं लैंगिक जीवन अडचणीत येतं.

Web Title: Sexual Life: Tips how to improve sex stamina without taking any medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.