लैंगिक जीवन : एका राऊंडनंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:05 PM2020-04-03T17:05:19+5:302020-04-03T17:13:12+5:30

शारीरिक संबंधानंतरचा थकवा २४ तास राहतो का? अशा प्रश्नांची उत्तरे महिला शोधत राहतात. मात्र, यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, शारीरिक संबंधानंतर झोपणे अजिबात चुकीचे किंवा गैर नाही.

Sex Life : Why Do Men Sleep Immediately After a Sex? api | लैंगिक जीवन : एका राऊंडनंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

लैंगिक जीवन : एका राऊंडनंतर पुरूष लगेच का झोपतात? वाचा महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...

googlenewsNext

अनेकदा तुम्हाला याचा अनुभव आला असेल की, काही पुरूष हे शारीरिक संबंधानंतर लगेच झोपतात. पण त्यांच्या महिला पार्टनरला याचा वैताग येतो. कारण त्यांना शारीरिक संबंधानंतर तुमची गरज असते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवल्यावर पार्टनरने लगेच झोपणं नॉर्मल असतं का? शारीरिक संबंधानंतरचा थकवा २४ तास राहतो का? अशा प्रश्नांची उत्तरे महिला शोधत राहतात. मात्र, यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, शारीरिक संबंधानंतर झोपणे अजिबात चुकीचे किंवा गैर नाही.

गैरसमज नकोत

अनेकदा असं होतं की, पुरूष शारीरिक संबंधानंतर महिला पार्टनरला मिठी मारत नसेल, बोलत नसेल किंवा थेट झोपत असेल तर महिलांच्या मनात अनेक वेगळ्या गोष्टी येतात. जसे की, तो स्वार्थी आहे, तो संतुष्ट झाला नाही, प्रेम नाही वगैरे. पण असे विचार करणे चुकीचे आहे. 

उलट रिअ‍ॅक्ट करतं पुरूषांचं शरीर

शारीरिक संबंध सामान्यपणे रात्रीच्यावेळी ठेवले जातात. त्यावेळी लोक थकलेले असतात. शारीरिक संबंधानंतर झोप येणे याचं हे एक मुख्य कारण आहे. खरंतर शारीरिक संबंध ही एक शरीर रिलॅक्स करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे झोप येणे सहाजिक आहे. तेच महिलांचं शरीर पुरूषांच्या उलट रिअ‍ॅक्ट करतं. ऑर्गॅज्ममुळे त्या उत्तेजित झालेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं मन आणखी प्रणयासाठी तयार असतं. 

हार्मोन्सही जबाबदार

पुरूष ऑर्गॅज्मनंतर इजॅक्यूलेट करतात आणि यादरम्यान जे हार्मोन्स रिलीज होतात त्यामुळे आळस येतो. तसेच शारीरिक संबंधादरम्यान शरीर फार थकतं. त्यामुळे शरीराला आरामाची म्हणजेच झोपेची गरज असते. जेणेकरून शरीर पुन्हा जोमाने काम करू शकेल.

ऑक्सिजनची कमतरता

Common misconceptions and myths related to sex private parts that people believe | लैंगिक जीवन : पहिल्यांदा ब्लीडींग गरजेचं? जाणून घ्या अशाच काही गैरसमजांबाबत...

अनेक लोक हे शारीरिक संबंधादरम्यान त्यांचा श्वास अधेमधे रोखून ठेवतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची कमतरला जाणवते. अशात त्यांना आराम करण्याची गरज भासते. तुम्हाला जर वाटत असेल तर शारीरिक संबंधानंतर लगेच झोप येऊ नये तर एक कप कॉफी सेवन करा. हा भलेही लॉन्ग टर्म उपाय नसला तरी याने उत्तेजना वाढते. तसेच कॅफिनमुळे थकवा कमी होतो.

Web Title: Sex Life : Why Do Men Sleep Immediately After a Sex? api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.