लैंगिक जीवन : अचानक इच्छा जागृत होते आणि कंट्रोलही राहत नाही? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 03:25 PM2019-11-15T15:25:46+5:302019-11-15T15:28:20+5:30

अनेकदा असं होतं की, एखाद्याला अचानक शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. अनेकदा ही इच्छा इतकी तीव्र असते की, स्वत:ला शांत करणंही किंवा याकडे दुर्लक्ष करणंही अवघड होतं.

Sex life: Sex drive and facts related to it | लैंगिक जीवन : अचानक इच्छा जागृत होते आणि कंट्रोलही राहत नाही? जाणून घ्या कारण...

लैंगिक जीवन : अचानक इच्छा जागृत होते आणि कंट्रोलही राहत नाही? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

अनेकदा असं होतं की, एखाद्याला अचानक शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. अनेकदा ही इच्छा इतकी तीव्र असते की, स्वत:ला शांत करणंही किंवा याकडे दुर्लक्ष करणंही अवघड होतं. अनेकांसोबत असं होत असेल आणि ते विचारात पडत असतील की, असं कसं होतंय? का होतंय? पण त्यांना काही यावर उत्तर सापडत नाही. कारण लैंगिक जीवनावर कधी काही अभ्यासू वृत्तीने वाचलच जात नाही किंवा कुणी यावर मोकळेपणाने बोलतही नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला असं होण्याचं कारण सांगणार आहोत. 

साधारणपणे शारीरिक संबंधाची इच्छा दोन प्रकारची असते. एक म्हणजे स्पॉन्टेनिअस म्हणजे अचानक शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होणे, दुसरी म्हणजे रिस्पॉन्सिव्ह म्हणजे एखाद्या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून उत्तेजनेची जाणीव होणे. अचानक शारीरिक संबंधाची ठेवण्याची होणारी इच्छा ही स्वाभाविक इच्छा असते. ही साधारणपणे तुमचे विचार, मन आणि हार्मोनल बदल यावर अवलंबून असते. 

महिलांबाबत सांगायचं तर मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवसांआधी आणि मासिक पाळी दरम्यान काही महिलांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा ही फार तीव्र असते. तेच पुरूषांमध्ये त्यांचे विचार आणि परिस्थिती यासाठी जबाबदार असते. हे सगळं हार्मोन्सवर अवलंबून असतं. जर असं कुणासोबत असेल म्हणजे अचानक शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत असेल आणि त्यावर तुम्ही कंट्रोल ठेवू शकत नसाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Study says Gonorrhea a sexually transmitted infection may also be found in the throat by doing french kiss | लैंगिक जीवन : डीप किसिंगमुळे होऊ शकतो गोनोरिया!

आता बघुया रिस्पॉन्सिव्ह सेक्स डिझायरबाबत. ही इच्छा सामान्यपणे तेव्हा होते, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकांतात असता आणि याच इंटेशनने एकमेकांच्या जवळ येता. त्यावेळी पुरूष आणि महिलेचं शरीर शारीरिक संबंधाची डिमांड करतं. असं पॉर्न बघतानाही अनेकदा होतं. यावेळी महिलांना प्युबिक एरियामध्ये तणाव होतो आणि पुरूषांना इरेक्शन होतं. 


Web Title: Sex life: Sex drive and facts related to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.