शिलाजीत सेक्शुअल हेल्थसंबंधी समस्या दूर करण्यासाठी एक लोकप्रिय आणि नैसर्गिक औषध मानलं जातं. भारतात वर्षानुवर्षे लैंगिक समस्या दूर करण्यासाठी तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी शिलाजीतचा वापर केला जातो. इतकेच काय तर शिलाजीतला इंडियन व्हायग्रा असंही म्हटलं जातं. हिमालयाच्या आजूबाजूला आढळून येणाऱ्या शिलाजीतमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात. तसेच यात ह्यूमिक अ‍ॅसिड आणि फल्विक अ‍ॅसिड नावाची खनिजेही आढळतात. यानेच वेगवेगळ्या सेक्शुअल समस्या दूर केल्या जात असल्याचा दावा केला जातो.

स्पर्म काउंट वाढवा

वेगवेगळ्या रिसर्चमधून हा दावा केला जातो की, शिलाजीतचं सेवन केल्याने स्पर्म काउंट वाढतो. याने टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि स्पर्मची क्वालिटीही सुधारते. महिलांसाठीही याचं सेवन समान फायदेशीर मानलं जातं. कारण शिलाजीतच्या सेवनाने त्यांची फर्टिलिटी वाढते.

ब्लड सर्कुलेशन वाढतं

(Image Credit : lifealth.com)

शिलाजीतमध्ये अनेक शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरळीत करतात. अर्थातच याने प्रायव्हटे पार्टच्या आजूबाजूला किंवा ओटी पोटाच्या आजूबाजूला ब्लड फ्लो वाढतो. या भागात ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे झालं तर इरेक्टाइल डिस्फक्शनची समस्या आणि कमजोरी सुद्धा जाणवणार नाही. लैंगिक जीवनातील या दोन सर्वात कॉमन समस्या आहेत.

स्ट्रेस करा कमी

स्ट्रेस आणि तणावामुळे लैंगिक जीवन सर्वात जास्त प्रभावित होते. शिलाजीतचं सेवन केल्याने ही समस्या दूर केली जाऊ शकत असल्याचा दावा केला जातो. याने शारीरिक संबंधातील अरसिकताही दूर होऊ शकते. पण याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं.

कसं कराल सेवन?

सामान्यपणे एक्सपर्ट्स एका व्यक्तीला एका दिवसात ३०० मिली ग्रॅम ते ५०० मिली ग्रॅम शिलाजीतचं सेवन करण्याचा सल्ला देतात. पण स्थितीची गंभीरता आणि वेगळ्या आजाराच्या औषधांमुळे शिलाजीत काळजीपूर्वक घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय शिलाजीतचं सेवन करू नये. अन्यथा यानेच काहीतरी समस्या होण्याचा धोका होऊ शकतो.


Web Title: Sex life: Know the Asphaltum or Shilajit benefits for sexual health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.