लैंगिक जीवन : Untimely Ejaculation होतं का? जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:23 PM2019-12-05T14:23:52+5:302019-12-05T14:29:10+5:30

अनटाइमली इजॅक्यूलेशन किंवा अवेळी स्खलनचा उल्लेख करतात लोकांच्या मनात अनेत समज-गैरसमज येतात. साधापण पुरूष त्यांना होणाऱ्या या समस्येबाबत बोलणं टाळतात.

Sex Life: How to handle untimely ejaculation | लैंगिक जीवन : Untimely Ejaculation होतं का? जाणून घ्या उपाय

लैंगिक जीवन : Untimely Ejaculation होतं का? जाणून घ्या उपाय

Next

(Image Credit : besthealthmag.ca)

अनटाइमली इजॅक्यूलेशन किंवा अवेळी स्खलनचा उल्लेख करतात लोकांच्या मनात अनेत समज-गैरसमज येतात. साधापण पुरूष त्यांना होणाऱ्या या समस्येबाबत बोलणं टाळतात. पण त्यांचं बोलणं किंवा या समस्येवर उपचार न घेणे अधिक वाईट आहे. तुम्हीही अशा समस्येचा सामना करत असाल तर ही समस्या कशी दूर करायची हे जाणून घ्या.

अनटाइमली इजॅक्यूलेशन ही एक अशी समस्या आहे ज्यावर सामान्यपणे पती-पत्नीही बोलत नाहीत आणि मनातल्या मनात झुरत राहतात. याने त्यांच्या नात्यावर वाईट प्रभाव पडतो. याबाबत Sexual Drugs आणि Magazine of Sexual Drugs मध्ये प्रकाशित दोन रिसर्चमध्ये माहिती देण्यात आली आहे.

अनटाइमली इजॅक्यूलेशन म्हणजे काय? 

(Image Credit : holidaysdom.com)

२००८ मध्ये वर्ल्ड सोसायटी फॉर सेक्शुअल ड्रग्सने लाइफ लॉन्ग अनटाइमली इजॅक्यूलेशनची व्याख्या सांगितली आहे. पण याठी काही ठराविक क्रायटेरिया दिला नाही. कारण ही समस्या होण्याची कारणे आणि वेळ व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात.

प्रीमॅच्युअर आणि अनटाइमली इजॅक्यूलेशनमध्ये फरक

Sex Life: Wearing condom during sex can reduce your erection | <a href='https://www.lokmat.com/topics/sex-life/'>लैंगिक जीवन</a> : ऐनवेळी ताठरता कमी होते? जाणून घ्या कारणे!

प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशनमध्ये फरक असतो. शारीरिक संबंध ठेवताना इंटरकोर्स केल्यावर केवळ ३० सेकंदात इजॅक्यूलेशन होत असेल तर त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्यूलेशन असं म्हणतात. तर अनटाइमली इजॅक्यूलेशन कधीही, कुठेही होऊ शकतं.

अनटाइमली इजॅक्यूलेशनचं कारण

अनेकांना सेक्शुअल डिसऑर्डरमुळे ही समस्या होत असते. तर काही लोकांमध्ये याची वेगळी कारणे असू शकतात. म्हणजे जर पुरूषाची एखाद्या महिलेशी टक्कर झाली, कुणी बोल्ड फोटो किंवा व्हिडीओ पाहत असेल तर रात्री स्पप्नादरम्यान अनटाइमली इजॅक्यूलेशनची समस्या होऊ शकते. 

महिलांमध्येही असते ही समस्या

अनटाइमली इजॅक्यूलेशन ही समस्या केवळ पुरूषांमध्येच असते असं नाही. ही समस्या महिलांमध्येही असू शकते. महिलांना मासिक पाळीदरम्यान किंवा जास्त उत्तेजक स्वप्ने बघिलत्याने ही समस्या होते. अनटाइमली इजॅक्यूलेशनला तुम्ही नाइट फॉलसारखं समजू शकता.

काय कराल उपाय?

अनटाइमली इजॅक्यूलेशनवरील उपचार व्यक्तीमध्ये याच्या गंभीरतेवर अवलंबून असते. काही स्थितींमध्ये काउन्सेलिंग आणि काही वेळा मेडिसिन्सने यावर उपचार करता येतात. यासाठी एखाद्या सेक्सॉलॉजिस्टची भेट घ्यावी.

एक्सरसाइज करा

तुम्हाला हे विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण एक्सरसाइज आपल्या सेक्शुअल हेल्थसाठी फार गरजेची असते. वर्कआउट, स्विमिंग, फील्ड गेम्सने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

व्हिटॅमिन आणि पौष्टीक पदार्थ

तुम्ही आहारातून भरपूर व्हिटॅमिन्सचं सेवन करूनही ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी आहारात फळं, हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.


Web Title: Sex Life: How to handle untimely ejaculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.