तुमचं रिलेशनशिप 'या' प्रकारचं असेल तर लैंगिक जीवन संपलंच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:09 PM2020-01-15T15:09:57+5:302020-01-15T15:32:17+5:30

शारीरिक संबंध हा कोणत्याही कपलमधील मजबूत नात्याचा आधार मानला जातो. प्रत्येक कपलचं लैंगिक जीवन चांगलंच सुरू असेल हे गरजेचं नाही.

Sex Life : Dead bedroom relationship can be dangerous for sex life, Know about it | तुमचं रिलेशनशिप 'या' प्रकारचं असेल तर लैंगिक जीवन संपलंच म्हणून समजा!

तुमचं रिलेशनशिप 'या' प्रकारचं असेल तर लैंगिक जीवन संपलंच म्हणून समजा!

Next

(Image Credit : huffingtonpost.in)

शारीरिक संबंध हा कोणत्याही कपलमधील मजबूत नात्याचा आधार मानला जातो. प्रत्येक कपलचं लैंगिक जीवन चांगलंच सुरू असेल हे गरजेचं नाही. जे कपल लग्नाआधी जास्त काळ रिलेशनशिपमध्ये राहिले असतील त्यांच्या सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये कडवटपणा येऊ शकतो. यामागे कारणेही वेगवेगळी असू शकतात. म्हणजे पार्टनरबाबत कमी आकर्षण, तणाव, जबाबदाऱ्यांचं ओझं किंवा शारीरिक संबंधातील इंटरेस्ट कमी होणं.

अनेकदा तर असंही बघायला मिळतं की, एक पार्टनर लैंगिक सुधारण्यासाठी जमेल ते प्रयत्न करतात, पण दुसरा पार्टनर कशातही इंटरेस्ट घेत नाही किंवा स्वत: काहीच प्रयत्न करत नाही. याचा परिणाम असा होतो की, असे कपल्स चिडचिडपणाचे शिकार होतात. अशा रिलेशनशिपला 'डेड बेडरूम रिलेशनशिप' असं म्हटलं जातं.

काय असतं हे डेड बेडरूम रिलेशनशिप?

हे एक असं रिलेशनशिप असतं ज्यात कपल वर्षभरातून केवळ ६ वेळा किंवा त्यापेक्षा वेळा इंटिमेट किंवा शारीरिक संबंध ठेवतात. पण डेड बेडरूमची रिलेशनशिप असणं किंवा नसणं हे कपलच्या सेक्शुअल प्रवृत्तीवर अवलंबून असते. जसे की, असंही असू शकतं की, काही कपल्सना आठवड्यातून केवळ एकच दिवस शारीरिक संबंध पसंत असेल.

काय असतात कारणे?

डेड बेडरूम रिलेशनशिपसाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात आणि यातील मुख्य कारणे म्हणजे तणाव आणि वाढत्या जबाबदाऱ्या. या कारणांमुळे पार्टनरचा शारीरिक संबंधातील इंटरेस्ट कमी होतो आणि त्यांना त्या गोष्टी नकारात्मक वाटू लागतात. अनेकदा ही स्थिती डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. बाळ झाल्यावरही लैंगिक जीवनात अनेक बदल होतात. त्याशिवाय आजकाल अनहेल्दी लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही कामेच्छा कमी होते. नंतर हेच डेड बेडरूम रिलेशनशिपचं कारण ठरतं. 

डेड बेडरूम रिलेशनशिपपासून बचाव

लैंगिक जीवन सुधारण्यासाठी, रोमांचक आणि रोमॅंटिक करण्यासाठी गरजेचं आहे की, पार्टनर्सने एकमेकांशी बोलावं. त्यांना ज्या समस्या असतील त्या त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर कराव्या. सोबतच पार्टनरला याची जाणीव करून द्या की, तुम्ही कोणत्याही स्थितीत त्यांच्यासोबत आहात. वेळ काढून कुठेतरी फिरायला जा. तणाव कमी करून शांत राहण्याचा प्रयत्न करा. याने तुमचं लैंगिक जीवन सुधारण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.


Web Title: Sex Life : Dead bedroom relationship can be dangerous for sex life, Know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.