लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:37 IST2019-01-22T17:37:21+5:302019-01-22T17:37:51+5:30
नेहमी जेव्हा गोल सेटींगचा येतो तेव्हा लोक आपल्या प्रोफेशनल लाइफ नवनवीन टार्गेट ठरवतात.

लैंगिक जीवनात नवा उत्साह आणण्यासाठी काही खास आयडिया!
नेहमी जेव्हा गोल सेटींगचा येतो तेव्हा लोक आपल्या प्रोफेशनल लाइफ नवनवीन टार्गेट ठरवतात. अनेकदा नात्यात पडलेली दरी दूर करण्यासाठीही खूप विचार केला जातो. पण ज्या गोष्टीवर लोकांचं फार कमी जास्त किंवा जातच नाही ती गोष्ट म्हणजे फिजिकल आणि सेक्शुअल इंटिमसी. तुम्हीही हे अनेकदा ऐकलं असेल की, शारीरिक संबंध कोणत्याही नात्यासाठी गरजेचे असतात. कारण याने दोन लोक बांधलेले राहतात. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं लैंगिक जीवन जगू शकता.
खेळ खेळा
जर तुमच्या रुटीन लैंगिक जीवनात तोच तोचपणा आला असेल किंवा कामेच्छा कमी झाली असेल तर जीवनात काही नवीन करण्याची, काहीतरी रोमांचक करण्याची वेळ आली आहे, असे समजा. यासाठी तुम्ही पार्टनरसोबत काही गेम्स खेळू शकता. जसे की, चिठ्यांचा गेम. म्हणजे या चिठ्ठ्यांवर तुम्ही काहीतरी नॉटी किंवा लिहा आणि हे एका बाऊलमध्ये टाका. त्यावर तुम्ही काहीही गमतीदार लिहू शकता. ते एकमेकांना करायला सांगा. यातून तुमचा लैंगिक क्रियेचा वेगळा अनुभव मिळेल आणि उत्साह सुद्धा वाढेल.
छोटे छोटे सेशन
तुम्हीही अनेकदा अनुभवलं असेल की, छोटे छोटे सेक्स सेशन मॅरेथॉन सेशनपेक्षा अधिक आनंद देणारे असतात. म्हणजे हे तुम्ही असंही समजू शकता की, फास्टफूड हे जास्त लोकांना आवडतं. छोट्या छोट्या सेशन म्हणजेच लैंगिक क्रियेंची खासियत म्हणजे हे तुम्ही कुठेही कधीही करु शकता. काही मिनिटात तुम्ही यातून आनंद मिळवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही तयारीची किंवा प्लॅनिंगची गरज नसते.
दिखावा करु नका
जर तुम्हाला शारीरिक संबंधावेळी संतुष्टी मिळत नसेल तरिही तुम्ही खोटं खोटं आनंद दाखवत असाल किंवा फेक ऑर्गॅज्म दाखवत असाल तर बंद करा. याबाबत पार्टनरसोबत बोला. आनंद आणि संतुष्टी कशी मिळवता येईल याबाबत एकमेकांशी बोला.
जागा बदला
अनेकदा असं होतं की, एकाच जागेवर लैंगिक क्रिया करुनही कंटाळा आलेला असतो. अशावेळी बेडची जागा बदला किंवा तुम्ही बेडरुमऐवजी हॉल किंवा बाथरुममध्ये लैंगिक क्रिया करु शकता. याने तुमच्या लैंगिक जीवनात एक नवीन रोमांच आल्याशिवाय राहणार नाही.